बीजिंग - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सध्या जगभरात चर्चेत आहे. अटीतटीच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरले. ही निवडणूक जिंकल्यानंतर बायडेन यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. अखेर चीननेही जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिका निवडणूक आणि आंतराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रियांवर आमची नजर असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन यांनी सांगितले.
अमेरिकेच्या जनमताचा आम्हाला आदर आहे. राष्ट्रध्यक्षीय निवडणुकीचे निकाल अमेरिकन कायद्यांनुसार आणि कार्यपद्धतीनुसार ठरवले जातील, असे वांग वेनबिन म्हणाले. रिपब्लिकन पक्षाने सध्याचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत पराभव स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर चीनने बायडेन यांचे अभिनंदन केले नाही. तसेच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनीही बायडेन यांचे अभिनंदन केले आहे.
अमेरिका - चीन वाद -
तथापि, मागील काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेमध्ये विविध आघाड्यांवर वाद सुरू आहे. पार युद्ध, कोरोनाचा उगम, हाँगकाँगमधील नागरिकांची गळचेपी, दक्षिण चीन समुद्रातील चीनचे अतिक्रमण, तैवान यावरून अमेरिका चीनच्या विरोधात उभा ठाकला आहे. चिनी कंपन्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अमेरिकेने 'क्लिन नेटवर्क' ही संपकल्पना पुढे आणली आहे. यास चीनने विरोध केला आहे. तसेच अनेक चिनी कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. ट्रम्प यांच्या पराभवानंतर बायडेन हे चीनप्रती काय भूमिका घेतील, हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.