ETV Bharat / international

शिंजो आबेंच्या राजीनाम्यानंतर जपानमध्ये पंतप्रधान पदासाठी शर्यत

मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगा(७१) यांनी मागील आठवड्यात अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. त्यासोबतच सुगा यांच्यापेक्षा कमी वयाच्या आणखी दोन प्रतिस्पर्ध्यांनीही अर्ज दाखल केला आहे. यामध्ये माजी संरक्षण मंत्री शिंगेरू इशिबा आणि माजी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांचा समावेश आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 8, 2020, 3:34 PM IST

टोकियो - प्रकृती अस्वास्थ्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीमाना दिल्यानंतर पंतप्रधान पदासाठी सत्ताधारी पक्षात शयर्त सुरू झाली आहे. जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रटीक पक्षाच्या अध्यक्षाची पंतप्रधानपदी नियुक्ती केली जाते. आबे अध्यक्षपदावरून म्हणजेच पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर आता नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी पाठिंबा मिळविण्यसाठी अभियान सुरू केले आहे.

मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगा(७१) यांनी मागील आठवड्यात अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच सुगा यांच्यापेक्षा कमी वयाच्या आणखी दोन प्रतिस्पर्ध्यांनीही अर्ज दाखल केला आहे. यामध्ये माजी संरक्षण मंत्री शिंगेरू इशिबा आणि माजी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांचा समावेश आहे.

१४ सप्टेंबरला नव्या अध्यक्षासाठी पक्षांतर्गत मतदान होणार आहे. नवनियुक्त अध्यक्षाची देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती होणार आहे. सुगा यांना अध्यक्षपदासाठी समर्थन मिळताना दिसत असून त्यांचे पक्षातील वजनही जास्त आहे. आबे यांची धोरणे आणि योजना पुढे नेण्यासाठी आश्वासक म्हणून नेता म्हणून सुगा यांच्याकडे पाहिले जात आहे. माध्यमातील पोलमधूनही सुगा इशिबा इतर उमेदवारांच्या पुढे निघाल्याचे दिसून येत आहे.

आधीच्या अध्यक्षपदीय निवडणुकांत माजी संरक्षण मंत्री शिंगेरू इशिबा हे आबे यांच्या प्रतिस्पर्धी होते. आबे यांच्याकडून पूर्ण न झालेली धोरणे आणि पुढे घेऊन जाण्याचे आश्वासन इशिबा यांनी दिले आहे.

आशिया पॅसिफिकमधील बदलती भू-राजकीय परिस्थिती

आशिया खंडामध्ये चीनने अमेरिकेला आव्हान देत वर्चस्व गाजविण्याासाठी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. कोरोना संकट, दक्षिण चिनी समुद्र, जपान-चीन सेक्याक्यू बेटांचा प्रश्न आणि चीन विरोधातील आघाडी, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. अशा स्थितीत जपानमध्ये नेतृत्व बदल होत आहे. चीन विरोधात भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा 'क्वाड' गट तयार होत आहे. त्यामुळे आशियाला पूर्वीपेक्षा सर्वात जास्त महत्व आले आहे. ७० टक्के समुद्री व्यापार आशिया पॅसिफिक खंडातून होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.