ETV Bharat / international

चीनच्या युद्धतयारीला चोरटेपणाचा आयाम, जे-२० लढाऊ विमाने होटन हवाई तळावर तैनात.. - भारत-चीन सीमावाद

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून १३० किलोमीटर दूर असलेला, होटन हा उत्तरेत भारतीय सीमेपासून सर्वात जवळचा पीएलएएएफचा हवाई तळ आहे. पीएलएच्या पाश्चात्य लष्करी कमांडकडून कार्यान्वित झालेल्या, होटन हवाई तळावर अगोदरच जे-१० आणि जे-११ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. आता तेथे आणलेल्या नव्या विमानांमध्ये जे-८ आणि जे-१६ एस या विमानांची भर पडली आहे. भारताशी असलेल्या द्वेषाचा खुलेपणाने उद्रेक झाला तर चीन आता पायदळापेक्षा हवाई दल, क्षेपणास्त्र आणि ड्रोनसारख्या साधनांवर पीएलए जास्त भर देईल, याबद्दल काहीच शंका नाही, या दृष्टिने ही करण्यात आलेली तैनाती महत्वाची आहे.

China deploys Stealth J-20 fighters in Hotan air base
भारताच्या सीमेजवळील हवाई तळावर चीनने तैनात केली 'जे-२० स्टील्थ' लढाऊ विमाने
author img

By

Published : Aug 18, 2020, 5:31 PM IST

Updated : Aug 18, 2020, 6:31 PM IST

नवी दिल्ली : आक्रमक धोरण टोकाला नेण्याची एकतर्फी लष्करी इच्छाशक्ति आणि मनीषा मजबूत करण्याच्या ताठर पवित्र्याचे संकेत चीनने दिले आहेत. त्या देशाने भारत केंद्रित अगदी जवळच्या हवाई तळावर, चोरट्या पद्धतीने हल्ला करणारी जे-२० विमानांची जमवाजमव सुरू केली आहे. याद्वारे भारताशी असलेल्या तणावपूर्ण संघर्षाचा आणखी एक थर वाढवला आहे.

सैनिकी परिक्षण उपग्रहाने पाठवलेली अलिकडची छायाचित्रे असे दाखवत आहेत की, पीएलएएएफने (पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स) जे-२० ही चोरून हल्ला करणारी लढाऊ विमाने होटन हवाई तळावर आणून ठेवली आहेत. यामुळे भारताशी असलेल्या तणावपूर्ण संघर्षाचा आणखी एक थर वाढवला आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून १३० किलोमीटर दूर असलेला, होटन हा उत्तरेत भारतीय सीमेपासून सर्वात जवळचा पीएलएएएफचा हवाई तळ आहे. पीएलएच्या पाश्चात्य लष्करी कमांडकडून कार्यान्वित झालेल्या, होटन हवाई तळावर अगोदरच जे-१० आणि जे-११ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. आता तेथे आणलेल्या नव्या विमानांमध्ये जे-८ आणि जे-१६ एस या विमानांची भर पडली आहे.

भारताशी असलेल्या द्वेषाचा खुलेपणाने उद्रेक झाला तर चीन आता पायदळापेक्षा हवाई दल, क्षेपणास्त्र आणि ड्रोनसारख्या साधनांवर पीएलए जास्त भर देईल, याबद्दल काहीच शंका नाही, या दृष्टिने ही करण्यात आलेली तैनाती महत्वाची आहे.

China deploys Stealth J-20 fighters in Hotan air base
सॅटेलाईट छायाचित्र

भारताने आपल्याकडूनही, गरज पडल्यास कारवाई करण्यासाठी, लेह विमानतळावर एलएसीनजीक मोठ्या प्रमाणावर शक्तिशाली हवाई आरमार तैनात केले आहे. यामध्ये सुखोई-३० आणि मिग २९ के लढाऊ विमाने, सी-१७ एअरलिफ्टर्स, पी ८ सैनिकी परिक्षण विमाने, हल्ला करण्यास सक्षम असलेली चिनुक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स, विविध प्रकारची इतर विमाने आणि युएव्ही यांचा समावेश आहे.

एलएसीच्या दोन्ही बाजूंना आघाडीवर महत्वाच्या क्षेत्रावर, दोन्ही देशांनी एक लाखांहून अधिक सैनिक आणि विशाल साधनसामग्रीचा साठा तैनात केला आहे. यात अवजड बंदुकांचाही समावेश आहे. चार महिन्यांपासून एकमेकांचा सामना करणार्या सैनिकी संघर्षामध्ये सर्वंकष युद्ध पेटवण्याची भयानक क्षमता आहे.

चेंगडु एअरक्राफ्ट डिझाईन इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या आणि पीएलएएएफने सप्टेंबर २०१७ मध्ये कार्यान्वित केलेल्या, पाचव्या आवृत्तीच्या जे-२० विमानांचे सामूहिक उत्पादन करण्यास चीनने अगदी अलिकडेच सुरूवात केल्याचे मानले जाते.पुढील २० वर्षे ही विमाने पीएलएएएफचा कणा असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

चोरट्या पद्धतीने हल्ला करण्याच्या क्षमतेशिवाय, ही पाचव्या आवृत्तीची लढाऊ विमाने जलद गतिने जाणारी, अधिक युक्तिबाज आणि जुन्या विमानांपेक्षा अधिक चांगली इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा असलेली अशी आहेत.

नव्या जे-२०(ज्यांना जे-२० बी असे म्हटले जाते) विमानांना रशियन सॅटर्न एएल-३१ इंजिनांची शक्ति पुरवली जात असून, येत्या एक किंवा दोन वर्षांत त्यांची जागा चिनी बनावटीची डब्ल्यू एस-१० तैहांग एरोइंजिने घेतील.सध्याच्या घडीला, पीएलएएएफकडे त्याच्या हवाई आरमारात ३० चेंगडु जे-२० लढाऊ विमाने असल्याचे मानले जाते. जे-२० लढाऊ विमाने ही कोणत्याही हवाई दलात दाखल झालेली केवळ तिसरी चोरट्या पद्धतीने हल्ला करणारी लढाऊ विमाने आहेत. अमेरिकन लष्करात एफ-२२ रॅप्टर आणि एफ-३५ संयुक्त हल्ला करणारी लढाऊ विमाने दाखल आहेत.

अमेरिकेने चीनला इषारा देण्यासाठी, हिंदी महासागरातील आपल्या सॅन डिएगो हवाई तळावर तीन बी २ चोरटी बाँबफेकी विमाने तैनात केल्यावर, चीनने हे पाऊल उचलले आहे.

अमेरिका आणि चीनची युद्धखोर प्रवृत्ती आक्रमक वळण घेत असताना, आशिया पॅसिफिक प्रदेशात चोरट्या पद्धतीने हल्ला करणार्या विमानांचा कळपच पहायला मिळत असून त्यात अमेरिकेने तैनात केलेली एफ-३५ आणि जपानने एफ-२२ तर दक्षिण कोरियाच्या एफ-३५ विमानांचा समावेश आहे.

कच्च्या वृत्तांनुसार, बी-२ बाँबर विमाने या प्रदेशातील भारत आणि इतर मित्रराष्ट्रांप्रति पाठिंबा व्यक्त करण्याच्या मोहिमेसाठी फ्लाय ओव्हर मिशन म्हणून आणि अंतर्गत कार्यान्वयनाची प्रात्यक्षिके म्हणून वापरली जाण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा एक चीनविरोधी चतुष्कोन मजबूत होत असल्याची चर्चाही सध्या जोरात सुरू आहे.

- संजीव के. बरूआ

Last Updated : Aug 18, 2020, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.