ETV Bharat / international

लष्करानं सरकारमधील लुडबूड थांबवावी, पाकिस्तानातील विरोधकांचा इशारा

author img

By

Published : Oct 21, 2020, 7:32 PM IST

Updated : Oct 21, 2020, 8:57 PM IST

पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी मिळून 'पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंट'(पीडीएम) हा गट स्थापन केला आहे. यात ११ विरोधी पक्षांचा समावेश आहे. इम्रान खान हे लष्कराने पंतप्रधान पदावर बसविलेले प्यादे असून खरी सत्ता लष्कराच्या हातात आहे. त्यामुळे देशात खरी लोकशाही येण्यासाठी इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.

Fazlur Rehman
फजलूर रेहमान

इस्लामाबाद - पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकार आणि लष्कराविरोधात जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनात ११ विरोधी पक्षांनी सहभाग घेतला असून त्यांच्याकडून देशभर सरकार विरोधात निदर्शने आणि आंदोलने सुरू आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. इम्रान खान हे लष्कराने पंतप्रधान पदावर बसविलेले प्यादे असून खरी सत्ता लष्कराच्या हातात आहे. देशात खरी लोकशाही आणण्यासाठी इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

लष्कराला दिला थेट इशारा

दरम्यान, आज जमात उलेमा-ई-इस्लाम (जेयूफ) पक्षाचे नेते फजलूर रेहमान यांनी सभा घेत पाकिस्तानी लष्करावर हल्लाबोल केला. लष्कराने सरकार, पोलिस आणि नागरी कामकाजात लुडबुड करणं थांबवावे, अन्यथा देशात ऐकी राहणार नाही, असा इशारा त्यांनी लष्कराला दिला. आत्तापर्यंत पाकिस्तानातील कोणत्याही विरोधी पक्षाने पाकिस्तानी लष्करावर थेट हल्ला केला नव्हता. मात्र, इंग्लमधून भाषण करताना सर्वात प्रथम माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांनी लष्करावर निशाणा साधल्यानंतर आज फजलूर रेहमान यांनी लष्कराला इशारा दिला.

संपूर्ण देशावर पाकिस्तानचे नियंत्रण आहे. प्रत्येत तहसिल आणि जिल्ह्यात लष्कारातील मेजर किंवा कर्नल बसलेला आहे. देशातील प्रत्येक सर्वोच्च संस्थेवर लष्करी अधिकाऱ्याचे नियंत्रण आहे. त्यामुळे आयुक्त, पोलीस महासंचालक असाह्य असल्याचे रेहमान म्हणाले.

विरोधकांनी सुरू केले सरकारविरोधी जनआंदोलन

पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी मिळून 'पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंट'(पीडीएम) हा गट स्थापन केला आहे. यात ११ विरोधी पक्षांचा समावेश आहे. कराची, गुजरनवाल या जिल्ह्यात विरोधकांनी बलाढ्य सभा घेतल्यानंतर इम्रान खान अस्वस्थ झाले आहेत. या सभांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिसून येत आहे. इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

Last Updated : Oct 21, 2020, 8:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.