काबूल - अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात शुक्रवारी तालिबानी दहशतवाद्यांना लक्ष्य करून केलेल्या हवाई हल्ल्यात 30 दहशतवादी ठार झाले. एका सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
प्रांतीय सरकारचे प्रवक्ते वाहिदुल्ला जुमजादा यांनी सिन्हुआला सांगितले की, 'सुरक्षा चौक्यांना नुकसान पोहोचवण्यासाठी तालिबानी बंडखोरांचा एक गट काराबाग जिल्ह्यातील करसी भागात जमला होता. परंतु, सुरक्षा दलाच्या विमानांनी शुक्रवारी पहाटेच त्यांच्यावर हल्ला केला आणि 30 दहशतवाद्यांना ठार केले.'
या छाप्यात आणखी दहा दहशतवादी जखमी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
या हल्ल्यात कोणत्याही सुरक्षा कर्मचारी किंवा नागरिकाचे नुकसान झाले नसल्याचे जुमझादा यांनी सांगितले.
तालिबानी दहशतवाद्यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.