काबूल - अफगाण सरकारने हक्कानी नेटवर्कमधील एका आणि २ तालिबानी दहशतवाद्यांना मुक्त करण्याची तयारी केली आहे. हे अत्यंत धोकादायक दहशतवादी असून त्यांना एका अमेरिकन आणि एका ऑस्ट्रेलियन प्राध्यापकाला सोडण्याच्या अटीवर मुक्त करण्यात येणार आहे. या दोघांना तालिबानने ओलीस धरल्याचे अफगाण राष्ट्राध्यक्ष अशरफ गणी यांनी सांगितले आहे.
'आम्ही एका अमेरिकन आणि एका ऑस्ट्रेलियन प्राध्यापकाला सोडण्याच्या अटीवर तीन तालिबानी कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेताल आहे. या दहशतवाद्यांना आमच्या आंतरराष्ट्रीय मित्रांच्या मदतीने परदेशात अटक करण्यात आली होती. ते सध्या अफगाण सरकारच्या बाग्राम येथील तुरुंगात आहेत,' असे गणी यांनी सांगितले.
अनास हक्कानी हा हक्कानी दहशतवादी गटातला महत्त्वाचा नेता आहे. तर, हाजी माली आणि अब्दुल राशिद हे दोघे तालिबानी दहशतवादी आहेत. त्यांनी अफगाणिस्तानातील अमेरिकन विद्यापीठाच्या प्राध्यापकांना सोडण्याच्या अटीवर मुक्त करण्यात येणार आहे.