ETV Bharat / international

तालिबानी दहशतावाद्यांचा पराभव करण्याकरिता अफगाण सरकारने 'हा' आखला प्लॅन - Afghanistans Interior Minister General Abdul Sattar Mirzakwal

अफगाणिस्तान सरकार हे महामार्ग, मोठ्या शहरांमध्ये महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच तालिबानी दहशतवाद्यांना सीमारेषा ओलांडून शहरे ताब्यात रोखण्यावर अफगाणिस्तान सरकार लक्ष केंद्रित करत आहे.

Afghan govt
Afghan govt
author img

By

Published : Aug 12, 2021, 5:03 PM IST

काबुल - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये विविध प्रांतावर कब्जा घेण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तान सरकारने तालिबानी दहशतवाद्यांचा पराभव करण्यासाठी तीन टप्प्यात नियोजन केले आहे.

अफगाणिस्तानचे केंद्रीय गृहमंत्री जनरल अब्दुल सत्तार मिर्झाकवाल म्हणाले, की देशातील 1,30 हजार पोलीस दलांचा प्रभार हा पाच आठवड्यापूर्वी घेतला. आम्ही तीन टप्प्यांत काम करत आहोत. पहिल्या टप्प्यात सरकारी सैन्यदलाचा पराभव टाळणे, दुसऱ्या टप्प्यात सुरक्षा दल एकत्रित करून शहराभोवती वेढा तयार करणे आहे. तिसऱ्या टप्प्यात कठोर मोहिम राबविणे आहे. या स्थितीला आम्ही दुसऱ्या टप्प्याच्या दिशेने जात आहोत.

हेही वाचा-गोवा : कलंगुट समुद्रकिनारी आढळला तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

तालिबानी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी अफगाणिस्तान सरकारचे प्रयत्न

अपरायझिंग मुव्हमेंट ही स्थानिक स्वयंसेवकांचे लष्कर आहे. या लष्कराने तालिबानींविरोधात विविध प्रांतात भाग घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील नऊ प्रांतामध्ये ताबा घेतला आहे. अफगाणिस्तान सरकार हे महामार्ग, मोठ्या शहरांमध्ये महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच तालिबानी दहशतवाद्यांना सीमारेषा ओलांडून शहरे ताब्यात रोखण्यावर अफगाणिस्तान सरकार लक्ष केंद्रित करत आहे.

हेही वाचा-दुहेरी दणका! राहुल गांधींच्या अकाउंटवर कारवाई केल्यानंतर काँग्रेसचे अधिकृत ट्विटर बंद

अपरायझिंगच्या लष्कराचा अफगाणिस्तान सरकारला पाठिंबा-

अपरायझिंगच्या लष्कराने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि अफगाणिस्तान सरकारला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. अपरायझिंगचे लष्कर हे सरकारी सुरक्षा दलाबरोबर तालिबांनीविरोधात लढा देत आहे. अपरायझिंगचे लष्कर वाढत असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यांचे सर्व सदस्य हे आपोआपा राष्ट्रीय सुरक्षा दलामध्ये विलीन होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा-झारखंडमधील दोन सायबर गुन्हेगारांना महाराष्ट्राच्या पुणे शहरातून अटक

सैन्यदलाच्या नवीन प्रमुखांची नियुक्ती

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सैन्यदलाच्या नवीन प्रमुखांची नियुक्ती केली आहे. हबितुल्लाह अलीझाई यांच्याजागी मोहम्मद अहमदझाई हे अफगाणिस्तानच्या सैन्यदलाचे प्रमुख असणार आहेत. अलीझाई यांनी यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा कंमाडोमध्ये कमांडर म्हणून काम केले आहे.

अफगाणिस्तानातील स्थिती चिघळली

अमेरिकेने सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. तालिबानने आतापर्यंत अफगाणिस्तानातील पाच प्रांतांच्या राजधानीवर ताबा मिळविला आहे. अमेरिकेचे सैन्य 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील संघर्ष सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या महिनाभरात इथे संघर्षात हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार शाखेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील दिवसेंदिवस चिघळत चाललेली स्थिती पाहता इथे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी आणण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिले आहेत.

31 ऑगस्टपर्यंत अमेरिकन सैन्य घेणार माघार

अफगाणिस्तानातून माघार घेण्यासाठी अमेरिकेला केवळ तीन आठवडे आणि एक दिवसांचा कालावधी उरलेला आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असतानाच तालिबानचा अफगाणिस्तानातील प्रभाव वाढत असून आतापर्यंत पाच प्रांतांच्या राजधानींवर तालिबानने ताबा मिळविला आहे. 31 ऑगस्टनंतर अमेरिकेकडून हवाई हल्ले सुरूच राहतील की नाही यावर बोलण्यास किर्बी यांनी नकार दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.