ETV Bharat / international

पाकिस्तानात बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट, 9 चिनी नागरिकांसह 13 ठार

पाकिस्तानमधील चीनच्या राजदूत कार्यालयाने बॉम्बस्फोटात चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी दिली आहे. पाकिस्तानमधील काही चिनी कंपन्यांच्या प्रकल्पांवर हल्ले करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट
पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट
author img

By

Published : Jul 14, 2021, 3:16 PM IST

Updated : Jul 14, 2021, 5:43 PM IST

लाहोर - दहशतवाद्यांचे नंदनवन मानले जाणारे पाकिस्तान हे बॉम्बस्फोटाने हादरले आहे. पाकिस्तानच्या वायव्य भागात असलेल्या दुर्गम भागात बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 9 चिनी नागरिकांसह 13 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा बॉम्बस्फोट चिनी नागरिकांना ठार मारण्यासाठी होता की अन्य कारणाने याबाबतची माहिती समोर आली नाही.

पाकिस्तानमधील चीनच्या राजदूत कार्यालयाने बॉम्बस्फोटात चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी दिली आहे. पाकिस्तानमधील काही चिनी कंपन्यांच्या प्रकल्पांवर हल्ले करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या घटनेची चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिज्जान यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची पाकिस्तान सरकारकडे मागणी केली आहे.

हेही वाचा-केरळमध्ये आणखी आढळले 2 'झिका'चे रुग्ण

पाकिस्तानकडून बॉम्बस्फोटाबाबत तपास सुरू-

बॉम्बस्फोटाबाबत तपास सुरू असल्याचे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पाकिस्तानची प्रतिमा बिघडविण्यासाठी हे बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत.

हेही वाचा-#WhereAreVaccines : लसीकरणावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

मृतामध्ये अभियंते व सर्वेक्षण करणारे कर्मचारी-

चीनच्या कंपनीकडून खैबर पख्तुनख्वा प्रांतात दासू धरणावर काम करण्यात येत आहे. या प्रकल्पात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये 30 चिनी नागरिक प्रवास करत होते. यामध्ये सर्वेक्षण करणारे व अभियंते यांचा समावेश होता. अचानक बसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने परिसरात भीती पसरला आहे. हा हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प म्हणजे चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे.

हेही वाचा-विकृतीचा कळस, 40 वर्षीय महिलेवर बलात्कार

प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये रोष-

दरम्यान, स्थानिक पाकिस्तानी नागरिकांचा प्रकल्पाबाबत रोष आहे. कारण, प्रकल्पाच्या कामामध्ये बाहेरील लोकांना नोकऱ्या दिल्या जातात. मात्र, स्थानिकांना अजूनही बेरोजगारी व गरिबी अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Last Updated : Jul 14, 2021, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.