गिलगिट - पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये ५.३ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. सोमवारी सायंकाळी ५ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भशास्त्र सर्वेक्षणानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील वायव्येकडील इदगाह येथे जमिनीखाली ३८ किलोमीटर खोल या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
हेही वाचा - 'चीन दडपशाहीतून स्वत:च्याच नागरिकांची ओळख आणि संस्कृती पुसून टाकतोय'
या भूकंपाचे हादरे हुंझा, गिलगिट, गझर, स्कार्डू या जिल्ह्यांमध्ये जाणवले. या भूकंपामुळे इमारतींनाही धक्के बसल्याने लोकांमध्ये घबराट पसरली. सर्वजण घरांमधून धावत रस्त्यावर जमा झाले. या भूकंपाचे धक्के काही प्रमाणात इस्लामाबाद, रावळपिंडी आणि आजूबाजूच्या भागांमध्येही बसले. मात्र, सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
हेही वाचा - पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या अफगाणिस्तानमध्ये ठार