ETV Bharat / international

पाकिस्तान : लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून चार जवानांचा मृत्यू

हे हेलिकॉप्टर शनिवारी सायंकाळी एस्तोर जिल्ह्याच्या मिनिमार्गात कोसळले. हे हेलिकॉप्टर तांत्रिकी कारणांमुळे दुर्घटनाग्रस्त झाले. यात पायलट, सह-पायलट आणि दोन जवानांचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Dec 27, 2020, 5:22 PM IST

4 Pak Army personnel killed
लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून चार जवानांचा मृत्यू

इस्लामाबाद - पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर गिलगिट-बाल्टिस्तान भागात तांत्रिकी कारणांमुळे कोसळले. यात पाकिस्तानच्या चार जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या सैन्य दलाने रविवारी दिली.

पायलट, सह-पायलटचा मृत्यू -

लष्कराने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे हेलिकॉप्टर शनिवारी सायंकाळी एस्तोर जिल्ह्याच्या मिनिमार्गात कोसळले. हे हेलिकॉप्टर तांत्रिकी कारणांमुळे दुर्घटनाग्रस्त झाले. यात पायलट, सह-पायलट आणि दोन जवानांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमधून लष्कराच्या एका जवानाचा मृतदेह स्कार्दुच्या एका रुग्णालयात नेण्यात येत होता.

हेही वाचा - गझनवी फोर्सच्या दहशतवाद्याला काश्मिरातून अटक

दरम्यान, या दुर्घटनेनंतर गिलगिट-पाकिस्तानचे माहितीमंत्री फतुल्लाह खान यांनी याबाबत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.