ETV Bharat / international

चीनमध्ये सापडला एकमेकांना मिठीत घेतलेल्या जोडप्याचा 1,500 वर्ष जुना सांगाडा - 1,500-year-old skeletons

उत्तर चीनमधील शांक्सी प्रांताचे उत्खनन करताना पुरातत्वशास्त्रज्ञांना 1500 वर्षापूर्वीचे एकमेकांना मिठीत घेतलेल्या अवस्थेत सांगाडे सापडले आहेत. हे सांगाडे उत्तर वेई राजवंशातील एका जोडप्याचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

1,500-year-old skeletons of a couple found in China
चीनमध्ये सापडले एकमेकांना मिठीत घेतलेले 1,500 वर्ष जुने सांगाडे
author img

By

Published : Aug 26, 2021, 7:01 PM IST

बीजिंग (चीन) - संपूर्ण इतिहास, साहित्य, लोककथा आणि कला यांनी मानवी भावनांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून प्रेमाचे चित्रण केले आहे. आपल्या प्रेमाचे महत्त्व सांगणाऱ्या विविध दंत कथा इतिहासात पाहायला मिळतात. मात्र, चीनमध्ये एकमेकांना मिठीत घेतलेल्या अवस्थेत असलेला 1500 वर्षापूर्वीचा एका जोडप्याचा सांगाडा सापडला आहे.

उत्तर चीनमधील शांक्सी प्रांताचे उत्खनन करताना पुरातत्वशास्त्रज्ञांना 1500 वर्षापूर्वीचे सांगाडे सापडले आहे. हे सांगाडे उत्तर वेई राजवंशातील एका जोडप्याचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

अशा अवस्थेत सापडले सांगाडे -

प्रेमासाठी जीवन संपवलेल्या विविध घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या आहे. चीनमध्ये एका कबरेमध्ये एकमेकांना अलिंगन दिलेल्या अवस्थेत एका जोडप्याचे सांगाडे आढळून आले आहे. सांगाड्यातील व्यक्तीने महिलेला कडकडून मिठी मारलेली आहे तर त्या महिलेने त्या व्यक्तीच्या कंबरेवर हात ठेऊन आपले नाक त्याच्या खांदावर घासत असल्याचे संशोधकांनी अहवालात म्हटले आहे.

पुरूषाचे 29 ते 35 तर महिलेचे 35 ते 40 दरम्यान वय -

संशोधकानुसार, त्या पुरूषाचे मृत्यूच्या वेळी 29 ते 35 च्या दरम्यान वय असावे आणि त्याची उंची ही 5 फूट 4 इंच असावी. तर त्या महिलेचे मृत्यूच्या वेळी 35 ते 40 वय असावे आणि तिचा एक हात तुटलेला व पायाची काहीतरी समस्या असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. ते एकाच कबरीमध्ये कसे आले असतील याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे. मात्र ते ज्या अवस्थेत आढळले आहेत यावरून ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते असेच चित्र समोर दिसत आहे.

हेही वाचा - काबूल विमानतळावर अव्वाच्या सव्वा दाम; पाण्याची बॉटल 1 हजार तर एक राईस प्लेट 7 हजार 500 रुपयांना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.