ETV Bharat / international

चीनमध्ये १४ नवे कोरोनाबाधित आढळलेत; बाधितांचा आकडा ८२ हजार पार - asymptomatic patient china

१४ रुग्णांमधील २ रुग्ण हे शनिवारी पॉझिटिव्ह आढळले होते. त्याचबरोबर, काल कोरोनामुळे एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या मृतकांचा आकडा हा ४ हजार ६३३ इतका आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून देण्यात आली आहे.

asymptomatic patient china
प्रतिकात्क
author img

By

Published : May 3, 2020, 12:36 PM IST

बीजिंग (चीन)- चीनमध्ये १४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील १२ रुग्ण हे कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. त्यामुळे, आता चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही एकूण ८२, हजार ८७७ इतकी झाली असून ४ हजार ६३० रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आज आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

१४ रुग्णांमधील २ रुग्ण हे शनिवारी पाझिटिव्ह आढळले होते. त्याचबरोबर, काल कोरोनामुळे एकही मृत्यू न झाल्याने मृतकांचा आकडा हा ४ हजार ६३३ इतकाच राहिल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून सांगण्यात आले आहे. चीनमध्ये देशाबाहेरून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ही १ हजार ६७२ इतकी आहे. त्यापैकी, ४५१ हे चीनी नागरिक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यापैकी ६ जणांची प्रकृती नाजूक आहे. चीनमध्ये आतापर्यंत लक्षण नसलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ही ९६८ इतकी आहे. यातील ९८ कोरोनाबाधित रुग्ण हे विदेशातून आलेले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे.

दरम्यान, चीनमधील हुबेई प्रांत हे २६ एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाले होते. मात्र, काल येथे देखील ६५१ कोरोनाबाधित आढळल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.

हेही वाचा- Global Covid-19 Tracker : जगभरामध्ये 2 लाख 44 हजार 778 दगावले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.