इस्लामाबाद - कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण काही देशांमध्ये कमी होत आहे तर काही ठिकाणी पुन्हा बाधितांमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानातील ११ न्यायालयांमध्ये न्यायाधीश आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने ही न्यायालये बंद करण्यात आली आहेत.
१२ न्यायाधीश आणि कर्मचार्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आल्यानंतर न्यायालयाचा आवार १४ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्लामाबाद बार असोसिएशनचे सचिव नाबिल ताहीर मिर्झा यांनी डॉन न्यूजला याबाबत माहिती दिली.
इस्लामाबादमध्ये कोरोनाच्या १५४ नवीन घटना
मानक ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) चे उल्लंघन केल्यामुळे परिस्थिती धोकादायक बनली आहे. सर्व सदस्यांना या नियमांचे पालन करण्याचा सतत सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारी बार असोसिएशनने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे सांगितले आहे. गुरुवारी इस्लामाबादमध्ये कोरोनाच्या १५४ नवीन घटना नोंदल्या गेल्या. तर या काळात एकाचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ४,८१० चाचण्या घेण्यात आल्या आहेत.