वॉशिंग्टन डी. सी. - मानवी आरोग्यासाठी दही हा अत्यंत पोषक पदार्थ असल्याचे सर्वांनाच माहित आहे. दररोज दही खाल्ल्याने महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, असे एका संशोधनात समोर आले आहे. लँन्सेस्टर विद्यापीठाच्या 'हेल्थ अॅन्ड मेडिसीन' विभागातील विद्यार्थ्यांनी याबाबत संशोधन केले.
हेही वाचा - तुर्कीमध्ये ६.८ रिश्टर स्केल भुकंपांचा धक्का; 14 जणांचा मृत्यू
दह्यामध्ये लॅक्टोजपासून तयार झालेले जीवाणू असतात. याच प्रकारचे जीवाणू स्तनपान करणाऱ्या महिलांच्या स्तनांमध्ये असतात. हे दोन्ही जीवाणूंचे एकत्र येणे महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामुळे महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते, असे लँन्सेस्टर विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे.