वॉशिंगटन डी. सी - दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एक जुनाटं बॉम्बर विमान अमेरिकेमध्ये कोसळलं आहे. बोईंग कंपनीचं बी - १७ हे व्हिन्टेज विमान कोसळल्यानं ७ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेतल्या कनेटिकेट येथील ब्रडली आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होत असताना हे विमान अपघातग्रस्त झाले.
हेही वाचा - नांदेड: अवयव घेऊन जाण्यासाठी आलेल्या विमानाला अपघात
भारतीय वेळेनुसार काल (बुधवारी) सकाळी १० वाजता विमान कोसळले. विमान लँड होत असताना धावपट्टीवरुन घसरल्यानं हा अपघात झाला, अशी माहिती फेडरल एव्हिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातामध्ये ७ जण जखमी झाले आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.
हेही वाचा - डीआरडीओचे मानवरहित विमान कर्नाटकमधील चित्रदुर्गात कोसळले
घटनास्थळावर धुराचे लोळ उठत असल्याचा या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बी १७ बॉम्बर विमानांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आली होती. तब्बल १२ हजार ७०० विमाने तयार करण्यात आली होती. हे जुनाट विमान अजूनही वापरण्यात येत होतं.