वॉशिंग्टन - अमेरिकेने एअर इंडियाला विमान वाहतुकीच्या कामकाजासाठी मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेच्या विमानतळावरील कामकाज करण्याची एअर इंडियाला अमेरिकेने परवानगी दिली आहे. यापूर्वी एअर इंडियाचे हे अधिकार अमेरिकेने काढून घेतले होते.
अमेरिकेच्या वाहतूक विभागाने एअर इंडियाला विमानतळावरील कामकाज करण्यावर जुलै २०१९ मध्ये निर्बंध लागू केले होते. हे आदेश मागे घेत अमेरिकेच्या वाहतूक विभागाने एअर इंडियाला पुन्हा विमान सेवेच्या संदर्भात कामकाज करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. हे आदेश विमान वाहतूक विभागाचे आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे सहायक सचिव जोएल झबात यांनी काढले आहेत. यापूर्वी अमेरिकेचा वाहतूक विभाग आणि अमेरिकन सरकार हे भारत सरकारबरोबर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी सातत्याने संपर्कात होते.
हेही वाचा- कोरोनाकाळात जुन्या चारचाकी खरेदीकडे ग्राहकांचा वाढला कल; दुचाकी विक्रीत घसरण
काही अटींवर ही परवानगी दिल्याचे अमेरिकेच्या वाहतूक विभागाने म्हटले आहे. यावर जनतेला आणि भागीदारांना २१ दिवसांपर्यंत आक्षेप घेता येणार आहेत. त्यानंतर हे आदेश लागू होऊन त्यांची अंमलबजावणी होणार आहे.
हेही वाचा-सोने प्रति तोळा ७७४ रुपयांची स्वस्त; 'हे' आहे दर कमी होण्याचे कारण
अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी नुकतेच अमेरिकेच्या वाहतूक विभागाचे सचिव एलैन छाओ यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाला दिलासा मिळाला आहे. कठीण काळात भारत आणि अमेरिका या वाहतूक क्षेत्रात भागीदार असल्याचे राजदुतांनी ट्विट केले आहे.