ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार?

author img

By

Published : Dec 5, 2019, 9:02 PM IST

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या संसदेत महाभियोगाची कारवाई सुरू आहे. तेथील काँग्रेस अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी यांनी ट्रम्प यांच्यावरील महाभियोग कारवाईबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या संसदेत महाभियोगाची कारवाई सुरू आहे. तेथील काँग्रेस अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांच्यावरील महाभियोग कारवाईबाबत सूचक वक्तव्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्या म्हणाल्या आहेत.

अमेरिकेची राज्यघटना धोक्यात आली आहे. राष्ट्राध्यक्षांनी कारवाई करण्यावाचून दुसरा पर्याय आमच्यापुढे ठेवलेला नाही. त्यामुळे महाभियोगाच्या कलमांखाली कारवाई सुरू करण्यास त्यांनी कायदे समितीला आदेश दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी संविधानाचे उल्लंघन केले असल्याचेही पेलोसी यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची कारवाई यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अनेक साक्षीदार तपासण्यातही आले आहेत. मात्र, अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर महाभियोग कारवाई अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे.

Intro:Body:

डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावरुन पायउतार होणार ? महाभियोग कारवाईचे काँग्रेस अध्यक्षांचे सूचक वक्तव्य  

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या संसदेत महाभियोगाची कारवाई सुरू आहे.  अमेरिकेन काँग्रेसच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी यांनी ट्रम्प यांच्यावरील महाभियोग कारवाई बाबत सुचक वक्तव्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्या म्हणाल्या आहेत.

अमेरिकेची राज्यघटना धोक्यात आली आहे. राष्ट्राध्यक्षांनी कारवाई करण्यावाचून दुसरा आमच्यापुढे ठेवला नाही. त्यामुळे महाभियोगांच्या कलमांखाली कारवाई सुरु करण्यास त्यांनी कायदे समितीला आदेश दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी संविधानाचे उल्लंघन केले असल्याचे पेलोसी यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची कारवाई यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे.  

मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या विरोधात महाभियागाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अनेक साक्षीदार तपासण्यातही आले आहेत. मात्र, अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर महाभियोग कारवाई अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.