ETV Bharat / international

कोरोनाचा कहर...अमेरिकेत 70 हजाराहून अधिक लोकांचा बळी

author img

By

Published : May 6, 2020, 9:28 AM IST

अमेरिकेमध्ये आतापर्यंत 70 हजार 115 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांची संख्या 11लाख 92 हजार 119 वर पोहोचली आहे. न्युयॉर्क आणि न्युजर्सीमध्ये सर्वांत जास्त कोरोना बाधित आढळले आहेत. तर जगभरात एकूण 2 लाख 53 हजार मृत्यू झाल्याची माहिती आहे.

US coronavirus death toll tops 70,000
US coronavirus death toll tops 70,000

वॉशिंग्टन - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सध्यपरिस्थितीत कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार अमेरिकेमध्ये पसरला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 2 हजार 333 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेमध्ये आतापर्यंत 70 हजार 115 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांची संख्या 11लाख 92 हजार 119 वर पोहोचली आहे. न्युयॉर्क आणि न्युजर्सीमध्ये सर्वांत जास्त कोरोना बाधित आढळले आहेत. तर जगभरात एकूण 2 लाख 53 हजार मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अमेरिकेतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या न्यूयॉर्कमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा आणि व्यवहार १५ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या ही जगभरातील रुग्णांच्या एक तृतियांश झाली आहे, तर बळींची संख्या जगातील बळींच्या एक चतुर्थांश झाली आहे.

अमेरिकेतील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या, ही आता तब्बल दोन दशके (१९५५-१९७५) चाललेल्या व्हिएतनाम युद्धातील बळींपेक्षाही जास्त झाली आहे. यूएस नॅशनल अर्काईव्ह्ज नुसार, व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेच्या ५८,२२० सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

अमेरिका हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे. तरीही एका विषाणूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. महासत्ता असलेला देश प्रथमच एवढा संघर्ष करताना दिसत आहे. अमेरिकेस कोरोनाचा सामना करताना कमालीचे अपयश आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.