ETV Bharat / international

युनिसेफ दिन : लहान मुलांच्या मदतीसाठीचा दिवस! - युनिसेफ काय आहे

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगभरातील लहान मुलांच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या एका विभागाने 'इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड'ची (आयसीईएफ) स्थापना केली होती. यानंतर महासभेने त्यात सुधारणा करत 'युनिसेफ'ची स्थापना केली..

UNICEF Day : A true children's day
युनिसेफ दिन : लहान मुलांच्या मदतीसाठीचा दिवस!
author img

By

Published : Dec 11, 2020, 1:32 PM IST

जगभरातील लहान मुलांच्या मदतीसाठीचा दिवस म्हणून 'युनिसेफ दिन' ओळखला जातो. युनिसेफचे आतापर्यंतचे कार्य पाहता, ह्या दिवसाला खऱ्या अर्थाने 'चिल्ड्र्न्स डे' म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड' म्हणजेच युनिसेफ. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ११ डिसेबंर १९४६ला याची स्थापना केली होती.

अशी झाली सुरुवात..

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगभरातील लहान मुलांच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या एका विभागाने 'इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड'ची (आयसीईएफ) स्थापना केली होती. यानंतर महासभेने त्यात सुधारणा करत 'युनिसेफ'ची स्थापना केली. सुरुवातीला केवळ चार वर्षांसाठी याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९५०मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याचा कार्यकाळ आणखी काही वर्षांनी वाढवला. त्यानंतर १९५३ला ही एक कायमस्वरुपी मोहीम करण्यात आली. या मोहिमेमध्ये जगभरातील लहान मुलांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सर्वसाधारण विकासाबाबत कार्य केले जाते.

युनिसेफचे कार्य..

  • २०१८मध्ये युनिसेफने एक मोहीम हाती घेतली होती. जगभरातील विविध संघटनांच्या मदतीने, लहान मुलांच्या विकासाला चालना, आणि आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करण्याची संधी देण्यासाठी ही मोहीम राबवली जात होती. २०१८ ते २०२१मध्ये जेवढे काम करणे अपेक्षित होते, त्याच्या ७५ टक्के काम युनिसेफने २०१९च्या शेवटीपर्यंतच पूर्ण केले होते.
  • २०१९मध्ये युनिसेफने जगभरातील ५ वर्षांखालील ३०७ दशलक्ष मुलांना कुपोषणाची शिकार होण्यापासून वाचवले. तसेच, १७ दशलक्ष मुलांच्या शिक्षणाची सोय केली.
  • २०१९ या एकाच वर्षात युनिसेफने ४ दशलक्ष लहान मुलांच्या कौशल्य विकासासाठी काम केले. १८.३ दशलक्ष मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिले. साधारणपणे एक दशलक्ष मुलांना स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करुन दिली. तसेच, ९६ देशांमध्ये आलेल्या २८१ आपत्तींमध्ये गरजेचे असे मदतकार्य केले.

युनिसेफ सध्या १९० देशांमध्ये कार्यरत असून, कोट्यवधी लहान मुलांच्या विकासासाठी आणि हक्कांसाठी आपले योगदान देत आहे.

हेही वाचा : गेल्या दहा वर्षातील शेतीविषयक आंदोलने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.