ETV Bharat / international

ट्रम्प यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह - US President Donald Trump latest news

नवीन रॅपिड टेस्ट किट द्वारे ट्रम्प यांची तपासणी केली गेली होती. या चाचणीचा निकाल अवघ्या 15 मिनीटांत प्राप्त झाला असून त्यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती अध्यक्षांचे डॉक्‍टर सीन कॉनली यांनी एका निवेदनात दिली आहे.

Trump tests COVID-19 negative for second time
ट्रम्प यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह
author img

By

Published : Apr 3, 2020, 9:51 AM IST

वॉशिंग्टन डीसी (यूएसए)- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुसर्‍यांदा कोवीड-19 तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या प्राणघातक आजाराची त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

नवीन रॅपिड टेस्ट किट द्वारे ट्रम्प यांची तपासणी केली गेली होती. या चाचणीचा निकाल अवघ्या 15 मिनीटांत प्राप्त झाला असून त्यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती अध्यक्षांचे डॉक्‍टर सीन कॉनली यांनी एका निवेदनात दिली आहे.

ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना ट्रम्प भेटले होते. या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही दिवसांनी ट्रम्प यांच्यासाठीही चाचणी झाली. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांचे माध्यम सहकारी असलेल्या फॅबिनो वाजनागार्तेन हे फ्लोरिडातील क्‍लबमधील कार्यक्रमात ट्रम्प यांच्या अगदी शेजारी उभे होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ट्रम्प यांनी आपली चाचणी करवून घेतली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.