वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप केला आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा या लोकप्रतिनिधीने केला आहे. या लोकप्रतिनिधी अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पॉल्सी आहेत.
अमेरिकेतील एका माध्यमामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक बाबींविषयी प्रश्न उपस्थित करणारा लेख छापून आला आहे. त्या लेखाचा आधार घेत नॅन्सी पॉल्सी यांनी ट्रम्प यांच्याकडील पैशाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा-इराणवरील निर्बंधांप्रकरणी अध्यक्ष रुहानी यांच्याकडून अमेरिकेचा निषेध
काय म्हटले आहे नॅन्सी पॉल्सी यांनी?
डोनाल्ड ट्रम्प यांनी संघराज्याचा प्राप्तिकर म्हणून 2016 आणि 2017 मध्ये केवळ 750 डॉलर भरले आहेत. मात्र, ही बातमी डोनाल्ड ट्रम्प यांनी खोटी असल्याचा दावा करत फेटाळून लावली आहे. नॅन्सी म्हणाल्या, की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 400 दशलक्ष डॉलर कर्ज असल्याचे अहवालातून दिसून येते. त्यांनी हे कर्ज कोणाला द्यायचे आहे? कोणत्या देशांना द्यायचे आहे? त्यांच्याकडे कर्जाचे प्रमाण किती आहे? माझ्यासाठी हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रत्यक्षात तुम्ही राष्ट्राध्यक्ष असताना तुमच्याकडे वैयक्तिक कर्जहमी देण्यासाठी लाखो डॉलर असू शकतात. आम्हा माहित नाही, तुम्हाला कोणी कर्ज दिले आहे? कदाचित ट्रम्प यांना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे कर्ज फेडायचे असेल, असे पॉल्सी यांनी सूचविले.
हेही वाचा-जगभरामध्ये 3 कोटी 33 लाख कोटी कोरोनाबाधित; तर 10 लाख बळी
काय आहे ट्रम्प यांच्यावर आरोप?
दरम्यान, माध्यमात प्रसिद्ध झालेल्या लेखात डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कंपन्यांविषयी गेल्या 20 वर्षांतील आकडेवारी देण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षापैकी 10 वर्षांत ट्रम्प यांनी प्राप्तिकर दिलेला नाही. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वैयक्तिक 300 दशलक्ष डॉलरचे कर्ज आहे. या कर्जाची चार वर्षांची मुदत आहे. मात्र, लेखात ट्रम्प यांनी थेट रशियाकडून कर्ज घेतल्याचे म्हटलेले नाही. तर विदेशातून अध्यक्षांना पैसा मिळाल्याचे लेखात म्हटले आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ट्विट करत माध्यमांवर निशाणा साधला आहे. बेकायदेशीरपणे मिळविलेली माहिती आणि केवळ वाईट उद्देश असल्याची ट्रम्प यांनी माध्यमांवर टीका केली.
ट्रम्प यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जोय बिडेन यांच्यासमवेत वादविवाद (डिबेट) होणार आहे. त्यापूर्वीच ट्रम्प यांना कर्जाचा स्त्रोत जाहीर न केल्याने अडचणींना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.