ETV Bharat / international

ट्रम्पना डिस्चार्ज! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच काढला मास्क - ट्रम्प कोरोना डिस्चार्ज

व्हाईट हाऊसचे डॉक्टर सेन कॉनले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्र्म्प हे अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. मात्र, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाताच, मास्क काढत ब्लू रुम बाल्कनीवरुन उपस्थितांना अभिवादन केले. सीएनएन वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली.

Trump removes mask after returning to White House
ट्रम्पना डिस्चार्ज! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच काढला मास्क
author img

By

Published : Oct 6, 2020, 9:58 AM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर व्हाईट हाऊसला परतताच त्यांनी आपला मास्क काढत उपस्थितांना अभिवादन केले. ट्रम्प यांची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते.

  • I will be leaving the great Walter Reed Medical Center today at 6:30 P.M. Feeling really good! Don’t be afraid of Covid. Don’t let it dominate your life. We have developed, under the Trump Administration, some really great drugs & knowledge. I feel better than I did 20 years ago!

    — Donald J. Trump (@realDonaldTrump) October 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हाईट हाऊसचे डॉक्टर सेन कॉनले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्र्म्प हे अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. मात्र, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाताच, मास्क काढत ब्लू रुम बाल्कनीवरुन उपस्थितांना अभिवादन केले. सीएनएन वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली.

रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व निकष पार पडल्यानंतरच ट्रम्प यांना सोडण्यात आले आहे. मात्र, तरीही ते पूर्णपणे सुरक्षित आहेत असे मानता येणार नाही. व्हाईट हाऊसमध्ये ते सुरक्षित असतील, तिथे २४x७ त्यांची काळजी घेण्यात येईल, असे सेन यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी सोमवारी सकाळीच आपण रुग्णालयातून जाणार असल्याचे सांगितले होते. कोरोनाला घाबरू नका अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली होती.

हेही वाचा : वादविवाद-चर्चेनंतर फ्लोरिडा, पेनसिल्व्हानियात बिडेन यांना पसंती, ट्रम्पना टाकले मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.