वॉशिंग्टन – प्राणघातक कोरोना विषाणू पसरविण्यासाठी चीन जबाबदार आहे, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. या विषाणुमुळे जगभरात 4.56 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत 1.22 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅली मॅकनॅनी यांनी सांगितले.
चीनला कोरोनाच्या संसर्गाबाबात जबाबदार ठरविल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना कधीही पश्चाताप झाला नसल्याचे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव कॅली मॅकनॅनी यांनी सांगितले. चीनने आखलेल्या मोहिमेत चीनच्या सैन्यदलाबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे. आम्ही सैन्यदलाच्या पाठिशी आहोत, असे कॅली यांनी पत्रकारांना सांगितले.
निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी कुंग फ्लू अशा शब्द वापरला होता. त्यावर ट्रम्प यांनी वांशिक टिप्पणी केल्याची अनेकांमध्ये भावना आहे. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कॅली मॅकनॅनी यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, की अध्यक्षांनी तशा अर्थाने शब्द वापरला नव्हता. कोरोनाचा उगम कोठून झाला आहे, याकडे त्यांना लक्ष वेधायचे होते, असे मॅकनॅनी यांनी सांगितले. तो योग्य मुद्दा होता. चीनने द्वेषमूलक पद्धतीने इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला.
कोरोनासाठी चीनने अमेरिकन सैनिकांना दोष दिला आहे. हे चीन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अध्यक्ष ट्रम्प म्हणतात, या विषाणुचे नाव उगम स्थानावरून मी देईन. कुंग फ्ल्यू म्हणण्यामागे आशियन-अमेरिकन लोकांचा विषाणुशी संबंध जोडण्याचा हेतू नाही. आम्ही अमेरिकेतील आणि जगभरातील आशियन अमेरिकन समुदायाचे संरक्षण करतो, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.