वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उर्मटपणे अमेरिकन काँग्रेसला बाजूला सारत शुक्रवारी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. त्यांनी अनेक दिवसांपासून अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी संसदेत निधीची मागणी केली होती. मात्र, विरोधकांनी विधेयकाला विरोध केल्याने ते मंजूर होऊ शकले नाही. तेव्हा ट्रम्प यांनी आणीबाणीचा इशारा दिला होता.
आता विरोधकांना न जुमानता ट्रम्प यांनी हा इशारा खरा करून दाखवला आहे. या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी इतर कोणताच पर्याय उरला नसल्याचे म्हटले आहे. अवैधरीत्या स्थलांतरित झालेले अमेरिकेत गुन्हे आणि मादक पदार्थांचा प्रसार करत आहेत. 'मी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत आहे. ही खूप मोठी बाब आहे. कारण, अमेरिकेवर मादक पदार्थ, गुन्हेगारी टोळ्या, अवैध स्थलांतरितांचे आक्रमण होत आहे,' असे ट्रम्प यांनी रोझ गार्डन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
याआधी अनेक आठवड्यांपासून अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांवर टाळेबंदीची (शटडाऊन) नामुष्की ओढवली आहे. अनेक वर्षांसाठी अंशतः सरकारी कार्यालयांची टाळेबंदी ओढवली तरी, त्याची तयारी असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. विरोधकांनी ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे लोकशाहीला दिलेले आव्हान आणि विरेधकांची गळचेपी असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.
Conclusion: