वॉशिंग्टन डी. सी. - प्रत्येकाचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, उद्दीष्ट्ये, काम करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे जेव्हा एकत्र काम करण्याची वेळ येते तेव्हा लहान-मोठे मतभेद समोर येतात. यामुळे व्यावसायिक आणि खासगी संबध धोक्यात येण्याची जास्त शक्यता असते. आपल्या सहकाऱ्याला जास्तीत-जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास होणारे वाद टाळता येऊ शकतात, असे संशोधकांचे म्हणने आहे.
इटलीमधील जिनीव्हा विद्यापीठातील विनील चाकोचान आणि विट्टोरी सेनगुयी यांनी याबाबतचा अभ्यास केला. 'गेम थेअरी'चा वापर करून त्यांनी दोन-दोन व्यक्तींचा समावेश असलेल्या गटांचे निरीक्षणे नोंदवली. गटातील दोन्ही व्यक्तींना सारखेच काम देऊन, त्यांची काम करण्याची पद्धत, सवय, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यावर काढलेले उपाय, लागलेला वेळ याचा सविस्तर अभ्यास केला.
हेही वाचा - मुलांपेक्षा जास्त झोपाळू असतात मुली!
आपल्या सहकाऱ्याच्या सवयी आणि काम करण्याच्या पद्धतीविषयी आपल्याला सविस्तर माहिती असेल तर कुठल्याही परिस्थीतीमध्ये त्याच्याशी जुळवून घेऊन काम करता येते. यामुळे संभाव्य वाद-विवाद टाळले जाऊ शकतात, असे संशोधक विनील चाकोचान यांनी सांगितले.