वॉशिग्टन (अमेरिका) - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या दुर्दैवी आणि अन्यायकारक मृत्यूबद्दल अमेरिकेमध्ये कोरोना विषाणू ऐवजी वर्णद्वेष हे मोठे संकट असल्याचे पाहायला मिळत आहे. लाखो अमेरिकन रस्त्यावर उतरले असून, सरकारला जॉर्जच्या मृत्यूबद्दल जाब विचारत आहेत. शनिवारी वॉशिग्टनमधील व्हॉईट हाऊस शेजारील रस्त्यावर उतरून हजारो नागरिकांनी पोलिसांच्या दमणशाही विरोधात निदर्शने केली.
"मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका"
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा माईनपोलीस याठिकाणी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत मोर्चे सुरू झाले आहेत. जॉर्जला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करीत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला.