ETV Bharat / international

अफगाणिस्तानातील सर्व नागरिकांना मायदेशी आणणार; राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं वचन

अमेरिकन नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्याची जबाबदारी आमची असून आम्ही त्यांना लवकरच परत घेऊन येऊ, असे वचन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नागरिकांना दिले आहे. व्हाईट हाऊस मध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
author img

By

Published : Aug 21, 2021, 9:52 AM IST

वाशिंग्टन - अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्याची जबाबदारी आमची असून आम्ही त्यांना लवकरच परत घेऊन येऊ, असे वचन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नागरिकांना दिले आहे. व्हाईट हाऊस मध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच बायडेन म्हणाले, हे इतिहासातील सर्वात मोठ्या एअरलिफ्टपैकी एक आहे.

अफगाणिस्तानातील सर्व नागरिकांना मायदेशी आणणार

अफगाणिस्तानला 20 वर्षे मदत केली -

जो बायडेन म्हणाले, अमेरिकेने अफगाणिस्तानला युद्धपरिस्थितीत 20 वर्षे मदत केली. अनेक अमेरिकन नागरिक त्याठिकाणी आहेत. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर परिस्थिती हिंसक झाली आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणणं आपली जबाबदारी आहे. अमेरिका प्रत्येक नागरिकाला परत आणणार. त्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.

तीन उड्डाणं होणार -

एका अमेरिकन अधिकारीऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, येत्या काही तासात काबूलहून अमेरिकेसाठी तीन विमानांचे उड्डाण होणार आहे. त्यामाध्यामातून जवळपास पंधराशे नागरिक परत येण्याची शक्यता आहे. तसेच अफगाणिस्तानात जवळपास सहा हजार अमेरकिन सैन्य आहे.

18 हजार लोकांना बाहेर काढलं -

काबूल विमानतळावरून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणं अतिशय कठीण काम आहे. मात्र सैन्य पूर्ण ताकदीनं ते काम करत आहे. बायडेन म्हणाले की, आतापर्यंत जवळपास 18 हजार लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. तसेच 14 ऑगस्टपासून तर आतापर्यंत 13 हजार लोकांना परत आणण्यात आलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.