ETV Bharat / international

कोरोनापेक्षा आजाराच्या भितीनेच जगात सर्वाधिक मृत्यू - The current situation in the country of Corona

कोरोनाबाबत नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. हे संशोधन मानवाच्या मानसिक स्थितीशी संबंधित आहे. अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू हा कोरोनामुळे होत नसून, त्या आजाराबाबत असलेल्या नकारात्मक भावनेतून निर्माण झालेल्या भितीमुळे होत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

Corona News Update
कोरोना
author img

By

Published : Oct 31, 2020, 6:11 PM IST

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोना आजार, त्याची लक्षणे, त्यावरील उपाय आणि कोरोनामुळे होणारे सामाजिक, मानसिक परिणाम अशा सर्वच स्थरावर सध्या शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे. कोरोनाबाबत नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. हे संशोधन मानवाच्या मानसिक स्थितीशी संबंधित आहे. अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू हा कोरोनामुळे होत नसून, त्या आजाराबाबत असलेल्या नकारात्मक भावनेतून निर्माण झालेल्या भितीमुळे होत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

हे संशोधन अमेरिकेतील हॉस्टन कॉनराड एन. हिल्टन कॉलेज ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट मॅनेजमेंट या संस्थेने केले आहे. या संस्थेच्या मते कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे. यामुळे व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होतो. तसेच कोरोनाबाधितांपासून अन्य व्यक्ती आपल्याला दूर ठेवण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये नकारात्मक भावना निर्माण होते आणि हीच भावना कोरोना आजारापेक्षा देखील घातक असते. या संशोधनात पुढे असे देखील सांगण्यात आले आहे की, कोरोना हा डोळ्याने दिसत नाही, या विषाणूला कोणीही पाहिले नाही. मात्र लांबलचक दात आणि तंबू असलेला एक भितीदायक लाल चेहरा अशी प्रतिमा प्रसार माध्यमांच्याद्वारे सातत्याने आपल्यापर्यंत पोहचत असते. त्यामुळे देखील नागरिक कोरोनाला घाबरत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.