ETV Bharat / international

कोरोनाला रोखण्यासाठी सहा फुटांचे 'सोशल डिस्टन्सिंग' पुरेसे नाही.. - six feet social distance

कोविड - 19 सारख्या आजाराला कारणीभूत असलेल्या हवेतून प्रसार होणाऱ्या विषाणूविषयी आणि त्याचा कशा प्रकारे संसर्ग होतो, हे अद्याप व्यवस्थित समजू शकलेले नाही. मात्र, लोकांच्या खोकल्याद्वारे तोंडातून बाहेर पडणारे कण कशा प्रकारे प्रवास करतात, याचा सखोल अभ्यास रोगप्रसाराच्या अभ्यासासाठी सहाय्यभूत ठरणार आहे.

सोशल डिस्टन्सिंग
सोशल डिस्टन्सिंग
author img

By

Published : May 22, 2020, 3:14 PM IST

वॉशिंग्टन डी. सी. - सध्या सामाजिक अंतर राखण्यासाठी (सोशल डिस्टन्सिंग) सहा फुटांचे अंतर प्रमाण मानले जात आहे. मात्र, संशोधकांना असे आढळले आहे की, हे अंतर पुरेसे नाही. साध्या आणि कमी प्रमाणातील खोकल्यामध्ये तोंडातून बाहेर पडणाऱ्या हवेचा वेग 4 ते 15 किलोमीटर प्रतितास असतो. अशा खोकल्यामध्ये लाळेचे थेंब 18 फूट लांबपर्यंत फेकले जाऊ शकतात. अशा स्थितीत सहा फुटांचे अंतर सुरक्षित ठरू शकणार नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

कोविड - 19 सारख्या आजाराला कारणीभूत असलेल्या हवेतून प्रसार होणाऱ्या विषाणूविषयी आणि त्याचा कशा प्रकारे संसर्ग होतो, हे अद्याप व्यवस्थित समजू शकलेले नाही. मात्र, लोकांच्या खोकल्याद्वारे तोंडातून बाहेर पडणारे कण कशा प्रकारे प्रवास करतात, याचा सखोल अभ्यास रोगप्रसाराच्या अभ्यासासाठी सहाय्यभूत ठरणार आहे.

द्रवपदार्थांच्या भौतिकशास्त्रातील एक प्रबंध एआयपी पब्लिशिंगने प्रकाशित केला आहे. यामध्ये तालिब डौक आणि दिमित्रिस ड्रिकाकिस यांनी हा प्रबंध लिहिला आहे. केवळ 4 किलोमीटर प्रतितास या वेगाने जाणाऱ्या हवेतही लाळेचे बारीकसे थेंब 5 सेकंदात 18 फूट अंतरापर्यंत प्रवास करत असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे.

'अशा प्रकारच्या थेंबांचा पुंजका वेगवेगळ्या उंचीच्या वयस्क व्यक्ती आणि लहान मुलांनाही बाधित करू शकतो', असे दिमित्रिस यांनी म्हटले आहे. यामुळे खोकल्यातील लाळेच्या थेंबांच्या मार्गात येणाऱ्या कमी उंचीच्या वयस्क आणि लहान मुलांवर याचा अधिक प्रभाव पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

'लाळेच्या द्रवामध्ये अनेक गुंतागुंतीचे घटक असतात. खोकल्यामधून ते मोठ्या प्रमाणात हवेत पसरतात. याशिवाय, या कणांच्या किंवा लाळेच्या बारीक थेंबांच्या हवेतील प्रसारावर आजूबाजूच्या वातावरणाचाही परिणाम होतो. हवेचे तापमान, दमटपणा, वाऱ्याचा वेग, बाष्पीभवनाचा वेग आदी अनेक बाबींचा हे कण किती लांबवर पोहोचतील किंवा एकमेकांपासून किती दूरवर जाऊ शकतील, यावरती प्रभाव पडतो,' असे या प्रबंधात म्हटले आहे.

लाळेच्या थेंबाचा हवेतून कसा प्रवास होतो, याविषयीचे द्रवपदार्थाचे गणनात्मक चलनशास्त्र (computational fluid dynamics simulation) डौक आणि दिमित्रि यांनी तयार केले आहे. यामध्ये वरील विविध बाबींचा लाळेच्या थेंबाच्या हवेत पसरण्यावर कसा परिणाम होतो, हे त्यांनी मांडले आहे. यासाठी त्यांनी या प्रबंधामध्ये जवळपास 3.7 दशलक्ष समीकरणे मांडून ती सोडवून दाखवली आहेत. यासाठी त्यांनी लाळेच्या 1,008 थेंबाचा अभ्यास केला.

'यापुढच्या अभ्यासात बंद खोलीतील जमिनीच्या तापमानाचा लाळेच्या थेंबांबर काय परिणाम होतो, याचे परीक्षण करायचे आहे. तसेच, वातानुकुलित जागेतील वातावरणाचा लाळेच्या थेंबाच्या हवेतील प्रसारावर होणारा परिणाम अत्यंत महत्त्वाचा आहे. तो कसा होतो, अशा वातावरणात लाळेतील कणांची हालचाल कशी होते, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.

'हा सर्वच अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, यामध्ये आरोग्य, सुरक्षित अंतरासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे, हवेतून रोगप्रसार कशा प्रकारे होतो हे समजणार आहे. याचा शास्त्रीय निष्कर्षांचा खबरदारी म्हणून करण्याच्या उपाययोजनांमध्ये उपयोग होणार आहे,' असे ड्रिकासिस यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.