ETV Bharat / international

अबब! 10 कोटी वर्षांपूर्वीचा 'अमर' खेकडा म्यानमारमध्ये आढळला!

author img

By

Published : Oct 27, 2021, 12:49 PM IST

Updated : Oct 27, 2021, 1:28 PM IST

इतिहासात पहिल्यांदाच 10 कोटी वर्षांपूर्वीचा खेकडा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. हा खेकडा म्यानमारमध्ये आढळला आहे. या अमर खेकड्याचे नाव 'क्रेटस्परा अथानाटा' आहे.

Scientists discovered immortal crab in amber aged 10 crore years
म्यानमारमध्ये आढळला 10 वर्ष कोटी जुना 'अमर' खेकडा

वॉशिंग्टन डी.सी - शास्त्रज्ञांना म्यानमारमध्ये 10 कोटी वर्षांपूर्वीचा खेकडा सापडला आहे. हा खेकडा केवळ पाच मिलीमीटर आकाराचा आहे. अंबरमध्ये सापडलेल्या या खेकड्याला शास्त्रज्ञ जिवंत खेकडा मानत असून त्याला 'अमर खेकडा' म्हणत आहे. अंबरमध्ये कैद झाल्यामुळे या खेकड्याचा देह अजूनही सुरक्षित आहे. या अमर खेकड्याचे नाव 'क्रेटस्परा अथानाटा' आहे.

संशोधकाचा असा विश्वास आहे की, क्रेटस्परा हा समुद्री खेकडा ही नव्हता किंवा तो नेहमी जमिनीवरही राहणारा नव्हता. एखाद्या झाडाच्या राळेत अडकलेला असा पहिलाच जीव आढळला आहे. आतापर्यंत अशा राळेत केवळ किटकच आढळलेले आहे. हे खेकडे घरटी बनवून राहतात. सागरी जीवनाच्या शोधातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी प्रगती मानली जाते. ज्युरासिक पार्क चित्रपटाच्या सीनप्रमाणे ही माहिती कुतूहल निर्माण करणारी ठरलेली आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी तसेच यूनान, रेजिना, लिन, ड्यूक, येल आणि चायना युनिव्हर्सिटी मधील 8 संशोधकांचा या संशोधनात सहभाग आहे.

हा ‘अमर’ खेकडा फार दुर्मिळ आहे, कारण शास्त्रज्ञांना सामान्यतः कीटक, कोळी, विंचू, मिलिपीड्स, पक्षी, साप अंबरमध्ये अडकलेले आढळलेले आहेत. पण ते सर्व जमिनीवरचे जिवंत प्राणी आहेत. पाण्यात राहणारा जीव अंबरमध्ये अडकल्याचे पहिल्यांदाच घडले आहे, असे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे पोस्टडॉक्टरल संशोधक झेवियर लुक यांनी सांगितले.

हेही वाचा - आता हा दाढीवाला कोण? नवाब मलिकांचा नवा खुलासा; त्याचा शोध घेण्याचे एनसीबीला आवाहन

Last Updated : Oct 27, 2021, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.