हैदराबाद : कमला देवी हॅरिस, विवेक मूर्ती, गौतम राघवन, माला अडिगा, विनय रेड्डी, भरत राममूर्ती, नीरा तांडेन, सेलिन गौंडर, अतुल गावंडे ही काही भारतीय नावे आहेत; ज्यांना यापूर्वी कधीच नव्हते इतके व्हाईट हाऊसच्या अति-अंतर्गत वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकन उपाध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांचे नाव २०२०च्या प्रचार मोहिमेत प्रथम अवतरल्यापासून काही आठवड्यांच्या आतच ही नावे अमेरिकन सत्तावर्तुळात फिरत आहेत.

आजच्या तारखेपर्यंत, जवळपास दोन डझन भारतीय-अमेरिकनांना बायडेन-हॅरिस यांच्या ए-टीमने उच्च अधिकार असलेल्या पदांवर नियुक्त केले आहे किवा नामांकन केले आहे. ३ नोव्हेंबर, २०२० च्या निवडणुकीआधी मॅकॉनमध्ये एका अफाट रॅलीच्या अगोदर, मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आणि रिपब्लिकन सिनेटर डेव्हिड परड्यू यांनी "कह-मह-लाह? कह-मह-लाह? कमला-मला-मला? कुणी असो, मी ओळखत नाही", असे म्हणत कमला हॅरिस यांची थट्टा केल्यावर ट्रम्प यांच्या चाहत्यांनी प्रचंड हास्याचा गडगडाट केला होता.

परड्यू यांनी आपल्या भाषणाने लक्ष वेधून घेतले असले तरीही, त्यांना किंवा ट्रम्प यांना त्यावेळी याची मुळीच कल्पना नव्हती की, २०२१ च्या व्हाईट हाऊसच्या प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत दोन डझन भारतीय नावे झळकणार आहेत. किंवा रिपब्लिकन सिनेटरच्या प्रतिक्रियेला जोरदार हादरा देत जॉर्जियामध्ये ४८ तासांत, विक्रमी १.८ दशलक्ष डॉलर्स इतका प्रचंड निधी उभा राहील - ज्या भागात अद्यापही दोन सिनेट जागांचा निकाल लागायचा होता.
६ जानेवारीपर्यंत, ज्या दिवशी ट्रम्पवादी हिंसक जमावाने वॉशिंग्टन डीसीमध्ये कॅपिटल इमारतीवर हल्ला चढवला होता; हॅरिस यांच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या साथीदारांनी जॉर्जियातील दोन्ही सिनेटच्या जागा जिंकल्याही होत्या आणि तेव्हाच अमेरिकेच्या सत्तासंतुलनात परिवर्तन झाले होते.

जेव्हा हॅरिस आणि अध्यक्षपदी निवड झालेले ज्यो बायडेन अमेरिकेचे नेतृत्व करण्यासाठी शपथ घेतील, तेव्हा त्यांच्या शपथग्रहणाबरोबरच व्हाईट हाऊसमध्ये भारतीय-अमेरिकन यशोगाथांचे आगमन होत असल्याचे सूचित होईल. या यशोगाथा औषधांपासून ते अर्थशास्त्र आणि डिजिटल संदेशवहनापासून ते स्टोरीटेलिंग अशा व्यापक पल्ल्याच्या विषयांपर्यंतच्या क्षेत्रातील तज्ञांच्या आहेत. गौतम राघवन, विवेक मूर्ती, माला अडिगा, विनय रेड्डी, भरत राममूर्ती, नीरा तांडेन, सेलिन गौंडर यांच्यामध्ये दूरानन्वयानेही अमेरिकीपणा नाही.

कमला हॅरिस यांना आपले नाव अमेरिकेत स्पष्ट करून सांगण्यासाठी खूप वेळ खर्चावा लागला आहे. 'द ट्रुथ्स वुई होल्ड' या नावाने आपल्या आठवणी हॅरिस यांनी लिहिल्या असून त्यांनी सांगितले आहे की, सुरूवातीला माझे नाव 'कॉमा-ला' (इंग्रजी विरामचिन्हाप्रमाणे) उच्चारण्यात येत असे. माझ्या नावाचा अर्थ कमळाचे फूल असा होतो, जे भारतीय संस्कृतीत महत्वप्राप्तीचे चिन्ह आहे. कमळ पाण्यात वाढते, आणि त्याचे फूल पृष्ठभागावर येत असले तरीही त्याची मुळे नदीच्या तळात घट्ट रूजलेली असतात. प्रचारमोहिमेत, 'कमळा'चे जिफ बनले, व्हिडिओ तयार झाला,. मीम झाले आणि इंटरनेटवर प्रत्येक प्रकारे त्याचा सांस्कृतिक समावेश झाला. जेव्हा श्यामला गोपालन हॅरिस यांनी आपल्या पहिल्या कन्येचे नाव कमला असे निवडले, तेव्हा ते हेतूपूर्वक आणि बराच विचार करून ठेवले होते.
कमला यांनी २००४ मध्ये लॉस अँजेलिस टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत "जी संस्कृती देवतेची पूजा करते ती कणखर महिलेला जन्म देते", असे स्पष्ट केले होते. कमला हे भारतीय हिंदू संस्कृतीत समृद्धी, भरभराट आणि सुदैवाचा वर्षाव करणार्या लक्ष्मी देवतेच्या १०८ नावांपैकी एक आहे.
आयएएनएसशी अलिकडेच केलेल्या संभाषणात, राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि एएपीआय डेटाचे संस्थापक कार्तिक रामकृष्णन यांनी कमला हॅरिस ज्या तमिळ ब्राम्हण परिवारातून आल्या आहेत, त्यांच्या अत्यंत खास अशा अनुभवाकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणतात की, पण विशेष हे आहे की, जेव्हा त्या आपल्या आईशी आपल्या नातेसंबंधांबाबत किंवा आमच्या पूर्वजांबद्दल, भारतातील नातेवाईकांबद्दल बोलतात, तेव्हा त्या जातिगत भारतीय-अमेरिकन किंवा दक्षिण आशियाई अमेरिकन अनुभवाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत नाहीत. मला वाटते की अनेक लोकांनी वैयक्तिकरित्या हा अनुभव घेतला आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या डेमोक्रेटिक राष्ट्रीय अधिवेशनात, कमला हॅरिस यांनी स्वतःची ओळख अमेरिकेला या शब्दांत करून दिली होती - आणखी एक महिला आहे, जिचे नाव माहित नाही, जिची कथा सांगितलेली नाही. ती महिला आहे जिच्या खांद्यावर मी उभी आहे, आणि ती म्हणजे माझी आई- श्यामला गोपालन हॅरिस.
अमेरिकेत परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी आलेल्या समुदायांमध्ये उच्चारांवरून अमेरिकन वाटणारी नावे किंवा गोऱ्यांची वाटतील अशी नावे धारण करण्याचा सोस ही एलिस बेटावरून पहिले बाहेरचे लोक आले तेव्हापासून परंपरा राहिली आहे. प्रत्यक्षात, अमेरिकेत ट्रम्प यांच्या कुटुंबातील पहिला पुरूष 'ड्रम्फ' होता - मावळते अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आजोबा फ्रेडरिक ड्रम्फ अमेरिकेत १६ वर्षाचे असताना आले.
तरीही, व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती केलेल्या आणि नामनिर्देशित केलेल्यांच्या यादीतीव दोन डझन भारतीय नावांच्या हजेरीच्या बातम्या रोज ठळकपणे प्रकाशात येत असताना एका नव्या दिशेकडेही निर्देश करत आहेत - परदेशी भूमीमध्ये आपल्या मुळाकडे परतणे.
एक गोष्ट मात्र नक्की; २०२०मध्ये ज्या कोणाला कमला नावाची टर उडवण्याची कल्पना सुचली असेल; त्याचे नशीब तिथेच पालटले म्हणावे लागेल.
हेही वाचा : जो बायडेन आज घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ