ETV Bharat / international

कोरोना विषाणूविरोधात लढणारा जनुक समूह शास्त्रज्ञांनी शोधला! - शास्त्रज्ञ

हा विषाणू कशा प्रकारे मानवी पेशीचे नुकसान करतो याचे नवे दाखले आम्हाला मिळाले. मात्र अजूनही या विषाणूची कमजोरी आम्हाला सापडलेली नाही. जेणेकरून त्याविरोधात प्रभावी अँटिव्हायरल तयार केले जाऊ शकेल असे सुमित चंदा म्हणाले.

कोरोना विषाणूविरोधात लढणारा जनुक समूह शास्त्रज्ञांनी शोधला!

author img

By

Published : Apr 19, 2021, 10:40 AM IST

वॉशिंग्टन : कोविड-19 साठी कारणीभूत ठरणाऱ्या सार्स-सीओव्ही-2 या विषाणूविरोधात लढणारा मानवी शरीरातील जनुक समूह भारतीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वातील अमेरिकेतील संशोधकांनी हुडकून काढला आहे. यामुळे कोरोनाची तीव्रता वाढण्याची कारणे आणि यावरील उपचार शोधण्यात मदत होईल अशी आशा संसोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

भारतवंशीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वात संशोधन

कॅलिफोर्नियाच्या सॅन दिएगोतील स्टॅनफोर्ड बर्नहॅम प्रेबीस मेडिकल डिस्कव्हरी इन्स्टिट्युटमधील शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन मॉलिक्युलर सेल या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. संस्थेतील भारतवंशीय प्राध्यापक सुमित के चंदा यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले. हा जनुक समूह विषाणूविरोधात लढणाऱ्या शरीरातील आघाडीचे सैनिक समजले जाणाऱ्या इंटरफेरॉनशी निगडित आहे.

सार्स-सीओव्ही-2 ला पेशीकडून कसा प्रतिसाद दिला जातो हे अधिक सखोलपणे आम्हाला जाणून घ्यायचे होते. संसर्गाला अधिक सक्षम किंवा कमकुवत प्रतिसादासाठी कोणते घटक जबाबदार असतात हे आम्हाला समजून घ्यायचे होते असे संस्थेतील प्राध्यापक सुमित के चंदा म्हणाले.

विषाणूची कमकुवत बाजू अजून सापडली नाही

हा विषाणू कशा प्रकारे मानवी पेशीचे नुकसान करतो याचे नवे दाखले आम्हाला मिळाले. मात्र अजूनही या विषाणूची कमजोरी आम्हाला सापडलेली नाही. जेणेकरून त्याविरोधात प्रभावी अँटिव्हायरल तयार केले जाऊ शकेल असे सुमित चंदा म्हणाले.

यामुळे मिळाली संशोधनाला दिशा

सार्स-सीओव्ही-2 ला इंटरफेरॉनच्या कमकुवत प्रतिसादामुळे आजाराची तीव्रता वाढत असल्याचे या महामारीच्या सुरूवातीलाच संशोधकांच्या निदर्शनास आले होते. यावरूनच चंदा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंटरफेरॉनद्वारे चालना दिल्या जाणाऱ्या मानवी जनुकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. या जनुकांना इंटरफेरॉन स्टिम्युलेटेड जीन्स(आयएसजी) असे म्हणतात.

65 आयएसजीकडून कोरोनावर नियंत्रण

65 आयएसजीने (इंटरफेरॉन स्टिम्युलेटेड जीन्स) सार्स-सीओव्ही-2 च्या संसर्गावर नियंत्रण मिळविल्याचे आमच्या निदर्शनास आल्याचे चंदा यांनी सांगितले. यात विषाणूला पेशीत प्रवेशापासून अटकाव करणाऱ्या, विषाणूच्या आरएनए निर्मितीला अटकाव करणाऱ्या तसेच विषाणूच्या एकत्रिकरणाला अटकाव करणाऱ्या जनुक समुहाचा समावेश असल्याचे चंदा म्हणाले. यापैकी काही आयएसजींनी तर असंबंधित विषाणूंवरही नियंत्रण मिळविल्याचे त्यांनी सांगितले. यात हंगामी फ्लु, पश्चिम नाईल आणि एचआयव्हीच्या विषाणूचा समावेश असल्याचे चंदा म्हणाले.

विषाणूच्या बायोलॉजीचा करणार अभ्यास

या संशोधनाच्या पुढील टप्प्यात संशोधक सार्स-सीओव्ही-2 च्या बायोलॉजी अर्थात जीवशास्त्राचा अभ्यास करणार आहेत. जेणेकरून यातील बदलांविषयी अधिक माहिती मिळून त्यावरील नियंत्रणासाठीचे उपाय शोधता येतील असे संशोधकांचे म्हणणे आहे.

कोणते जनुक विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी मदत करते हे कळल्यास संशोधकांना मोठी मदत होऊ शकते. आजाराची तीव्रता वाढण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात हे कळल्यासही उपचार पद्धती विकसित करण्यास मदत होऊ शकते असे संस्थेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.