न्युयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायप्रस देशाचे अध्यक्ष निकोस अॅनास्टासिडीस यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये संबध सुधारण्यासाठी द्विपक्षीय चर्चा झाली. चर्चा आणि राजनैतिक भेटींद्वारे दोन्ही देशांमधील संबध वृद्धींगत होतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
-
Had a productive meeting with President @AnastasiadesCY. We discussed the full gamut of issues pertaining to India-Cyprus friendship. This includes boosting commercial, cultural and technological linkages. pic.twitter.com/CcwaXM4MpJ
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Had a productive meeting with President @AnastasiadesCY. We discussed the full gamut of issues pertaining to India-Cyprus friendship. This includes boosting commercial, cultural and technological linkages. pic.twitter.com/CcwaXM4MpJ
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2019Had a productive meeting with President @AnastasiadesCY. We discussed the full gamut of issues pertaining to India-Cyprus friendship. This includes boosting commercial, cultural and technological linkages. pic.twitter.com/CcwaXM4MpJ
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2019
मध्य पुर्वेमध्ये तणावाची परिस्थिती असताना दोन्ही देशांमध्ये ही बैठक झाली. अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. चर्चेद्वारे सायप्रस आणि भारतामध्ये संबध दृढ होऊ शकतात, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी या बैठकीचा फोटो ट्विट केला आहे. दोन्ही देशांमध्ये संबध सुधारण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली. व्यापार, सांस्कृतीक देवाणघेवाण, तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा झाली, अशी माहीती पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन दिली.
पंतप्रधान मोदी ७ दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर मोदी आज( शुक्रवार) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये बोलणार आहेत. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभुमीवर मोदी संयुक्त राष्ट्रामध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी विविध उद्योगपतीच्या गटांशीही मोदींनी व्यापार वाढीबाबत चर्चा केली.