इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद मिटवेत. यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करू इच्छितो, असे पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
दोन्ही देशांतील जनतेला गरिबीतून मुक्तता मिळावी, तसेच प्रादेशिक विकास साधता यावा, यासाठी उभय देशांत चर्चा हा एकमात्र उपाय आहे. काश्मीर मुद्यासह इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करू इच्छितो, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. मोदींना त्यांच्या पंतप्रधान पदावर दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांनी या पत्राद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत.