नवी दिल्ली - एखादं काम करत असताना तुमच्या लहान मुलांनी त्यात लुडबूड करणं ही एक सामान्य बाब आहे. मात्र, तुम्ही वृत्तनिवेदिका आहात आणि लाईव्ह टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सांगत असतानाच तुमचा छोटा मुलगा येऊन आई-आई करून गळ्यात पडण्याचा उपद्व्याप कॅमेऱ्यासमोरच करत असेल तर...? अशा वेळेस मुलावर डोळे वटारावेत की त्याचा प्रेमाने गालगुच्चा घ्यावा हे आईला कळणार नाही. असाच काहीसा प्रकार एमएसएनसीबीच्या वृत्तनिवेदिकेसोबत झाला.
-
Sometimes unexpected breaking news happens while you're reporting breaking news. #MSNBCMoms #workingmoms pic.twitter.com/PGUrbtQtT6
— MSNBC (@MSNBC) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sometimes unexpected breaking news happens while you're reporting breaking news. #MSNBCMoms #workingmoms pic.twitter.com/PGUrbtQtT6
— MSNBC (@MSNBC) October 9, 2019Sometimes unexpected breaking news happens while you're reporting breaking news. #MSNBCMoms #workingmoms pic.twitter.com/PGUrbtQtT6
— MSNBC (@MSNBC) October 9, 2019
तर, अमेरिकेतील ही वृत्तनिवेदिका सिरिया-तुर्की बॉम्बस्फोटाची वृत्तांकन करत होती. संपूर्ण जग ही अत्यंत गंभीर लाईव्ह न्यूज पहात असतानाच अचानक निवेदिकेच्या मुलाने येऊन लडिवाळपणे आईच्या गळ्यात हात टाकला. त्यामुळे गंभीर बातमी सांगणाऱ्या निवेदिकेलाही हसू आवरले नाही. 'एक मिनिट माझा मुलगा येथे आला आहे. लाईव्ह टिव्हीवर' असं म्हणत तिनं परिस्थिती सांभाळून घेतली. मात्र, यामुळे सगळ्या जगाला बॉम्ब स्फोटाच्या गंभीर बातमीसोबतच एक ताण हलका करणारी बातमीही पाहायला मिळाली. कर्टनी क्यूब असे या वृत्तनिवेदिकेचे नाव आहे.
दरम्यान, या लहानग्याला लाईव्ह टीव्हीसमोरून बाजूला करेपर्यंत पीसीआरकडून तत्परतेने दुसरे व्हिज्युअल चालवण्यात आले.
विशेष म्हणजे, या वृत्तसंस्थेनेही कौतुकाने या गोड माय-लेकांचा हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ब्रेकिंग बातमीचे वृत्तांकन करत असताना एखादी अशी बातमी ब्रेकिंग होते. जिची आपल्याला अपेक्षा नसते, असे वृत्तवाहिनीने टि्वटमध्ये म्हटले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याला व्हिडिओला 30 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पसंती दिली आहे.