ETV Bharat / international

Joe Biden inauguration : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पहिल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - जो बायडेन

जो बायडेन यांनी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अमेरिकेला व जगाला उद्देशून भाषण केले. आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात आजचा दिवस हा लोकशाहीचा दिवस असल्याचं सांगत अमेरिकेसमोर असलेल्या आव्हानांबाबत व जागतिक धोरणांबाबत बायडेन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

joe biden oath american president
joe biden oath american president
author img

By

Published : Jan 21, 2021, 12:35 AM IST

Updated : Jan 21, 2021, 8:29 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेत जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. नवनिर्वाचित अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देशाचे 46वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.

जो बायडेन यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  • अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक भाषण करताना जो बायडेन यांनी अमेरिकेसमोरच्या समस्या आणि आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीची रूपरेषा देशासमोर आणि जगासमोर मांडली. यावेळी बायडेन यांनी त्यांच्या सहकारी आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचेही विशेष कौतुक केले.
  • आपल्या अध्यक्षीय भाषणादरम्यान, कमला हॅरिस यांचा उल्लेख करताना जो बायडन म्हणाले की, कमला हॅरिस ह्या अमेरिेकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. आज आपण एका महिलेला या जबाबदारीच्या पदासाठी शपथ घेताना पाहिले. त्यामुळे काही गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत, असा विचार कधी करू नका. भारतातील तामिळनाडूमध्ये आजोळ असलेल्या कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षातील अध्यक्षीय उमेदवारीसाठी बायडेन यांना आव्हान दिले होते. मात्र नंतर आपली दावेदारी मागे घेत त्या बायडेन यांच्या समर्थक बनल्या होत्या. यावेळी बायडेन यांनी आजचा दिवस लोकशाहीचा दिवस असल्याचे सांगत अमेरिकेसमोरची आव्हाने व आपली भूमिका विषद केली.
  • जो बायडन यांनी यूएसला संबोधित करताना म्हटले की, हे एक महान राष्ट्र आहे व आपण सर्व महान लोक आहोत. शांति व युद्धासोबत आपण पुढे आलो आहोत.
  • बायडन म्हणाले, की एका व्हायरसने अमेरिकेतील इतक्या लोकांचा जीव घेतला जितके बळी महायुद्धातही गेले नव्हते. कोरोनामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
  • जो बायडन म्हणाले, की अमेरिकेचा इतिहास संघर्षाने भरलेला आहे. जागतिक महामंदी असो किंवा वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील दहशतवादी हल्ला असो या संकटातून आपण पुढे आलो आहोत. अमेरिकेला एकता सर्वात जास्त गरजेची आहे. त्याशिवाय शांती राहू शकत नाही. नागरिकांच्या एकतेशिवाय संयुक्त राष्ट्र संबोधले जाऊ शकत नाही.
  • बायडेन यांनी आपल्या भाषणात अमेरिकेत निर्माण झालेल्या मनभेदांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच देशाला दुरुस्त करण्याची गरज विषद करत, अमेरिकेचे ऐक्य साधण्याचा निर्धार व्यक्त केला.
  • अध्यक्षीय निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत भाष्य करताना कॅपिटल हिलसारखा हिंसाचार पुन्हा होणार नाही, असे वचन बायडन यांनी आपल्या भाषणातून जनतेला दिले. तसेच वर्णभेदाविरोधात लढण्याची गरजही विषद केली.
  • जागतिक राजकारणाबाबत भाष्य करताना बायडन यांनी अमेरिका आपल्या आघाड्या पुन्हा एकदा बांधणार आहे. आम्ही शक्तीच्या जोरावर नेतृत्व करणार नाही. तर बळाचा वापर करून शक्तीसह कसे काम करायचे हे दाखवून देऊ.
  • सध्याचा काळ हा अमेरिकेसाठी परीक्षेचा आहे. मात्र या परीक्षेत आम्ही यशस्वी होऊ असा विश्वासही बायडन यांनी व्यक्त केला.
  • आपल्या कार्यकाळाचा उद्देश सर्वांचा विकास आणि सर्वांचे रक्षण हा राहील असेही बायडन यांनी स्पष्ट केलं.

Last Updated : Jan 21, 2021, 8:29 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.