वॉशिंग्टन (डीसी) - युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेतील भारतीय दूतावासात भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्टला साजरा करण्यात आला. भारतीय दूतावासाचे प्रमुख तरणजीतसिंग संधू यांनी इंडिया हाऊस येथे तिरंगा ध्वज फडकविला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की मागील काही दिवसांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. यामुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही. परंतु, नवीन तंत्रज्ञान वापरून आपण आभासीपणे भेटू शकतो, म्हणून आपण याचे आभार मानले पाहिजे. तसेच या महामारीविरुद्ध प्रत्यक्ष काम करणारे डॉक्टर, सिस्टर व सर्व मेडिकल स्टाफ तसेच पोलीस यांचे आपण आभार मानू. आपला भारत देश या महामारीविरुद्ध चांगला लढा देत आहे.