वॉशिंग्टन डी. सी - भारत आणि अमेरिकेने मंगळवारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली. परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि अमेरिकेचे राजनैतिक कारवायांचे राज्य सचिव डेव्हिड हेल यांच्या नेतृत्वात बैठक झाली. द्विपक्षीय सहकार्य, संरक्षण, सागरी क्षेत्र आणि कोरोना या विषयावर बैठकीत चर्चा झाली.
भारतीय पॅसिफिक सागरी प्रदेश मुक्त, शांततापूर्ण ठेवण्यासंबधीत विषयावर चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी बळकट होण्याच्या दृष्टीनेही संवाद झाला. दोन्ही देशाच्या नेतृत्वांनी स्थापन केलेल्या अमेरिका-भारत व्यापक जागतिक रणनीतिक भागीदारीला बळकटी देण्यासाठी बैठकीत ठोस पावले उचलण्यात आली. आरोग्य, औषधे आणि कोरोना लस विकसीत करण्यासंबधित विषयाचा आढावा घेण्यात आला आहे.
इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीन वेगाने सैन्य व आर्थिक प्रभावाचा विस्तार करीत आहे. या सर्व आव्हानांवर बारकाईने सल्लामसलत करत उद्दीष्ट साध्य करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.