ETV Bharat / international

अमेरिकेत आता 'बायडेनपर्व'; 'हे' करून दाखवणार..

कोरोनामुळे डगमगलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, व्हिसा, कर प्रणाली, कोरोना महमारी, आरोग्य सेवा, राष्ट्रीय सुरक्षा आणि परकिय धोरण, पर्यायवरण, शिक्षण व्यवस्था, सामजिक सुरक्षा, व्यापार अशी अनेक आव्हाने बायडेन सरकारसमोर आहेत. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी बायडेन यांनी १.९ ट्रिलियन डॉलर(१३८ लाख कोटी) चे महाकाय प‌ॅकेज जाहिर केले होते. अमेरिकन रेस्क्यू प्लॅन अंतर्गत छोटे व्यवसायीक, सरकार, राज्य, स्थानिक सरकार यांना दिलासा देण्यात येणार आहे. प्रत्येकाला थेट मदत करण्याचा निर्धार या प‌ॅकेज अंतर्गत करण्यात आला आहे.

बायडेन
बायडेन
author img

By

Published : Jan 20, 2021, 8:02 PM IST

Updated : Jan 20, 2021, 8:50 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवरीला शपथ घेणार असून त्यांच्या शपथ सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा बायडेन यांनी पराभव केला. यावेळी जो बायडेन यांनी सत्तेत येण्यासाठी अनेक आश्वासने अमेरिकन नागरिकांना दिली होती. आता अमेरिकेचा कारभार स्वीकारल्यानंतर बायडेन यांच्यासमोर आरोग्य, कोरोना महामारी, पर्यायवरण समस्या, शिक्षण आदी आव्हाने आहेत. तथापि, याच मुद्यांवरून डोनाल्ड ट्रम्पविरोधात त्यांनी प्रचार केला होता.

Biden presidency
अमेरिकन जनतेला आज मिळणार नवा कारभारी....

अमेरिकेत बराक ओबामा हे अध्यक्ष असताना त्यांनी एक आरोग्यसेवा योजना लागू केली होती. अमेरिकेन लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा त्यांचा उद्देश होता. या योजनेला 'ओबामा केअर' असेही म्हटलं जातं. ही योजना रद्द करण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांची होती. मात्र, या योजनेचा विस्तार करून याचा फायदा अमेरिकेन नागरिकांना मिळावा, असे मत बायडेन यांचे आहे.

Biden presidency
बायडेन यांच्यासमोर अनेक आव्हाने

कोरोनामुळे डगमगलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, व्हिसा, कर प्रणाली, कोरोना महमारी, आरोग्य सेवा, राष्ट्रीय सुरक्षा आणि परकिय धोरण, पर्यायवरण, शिक्षण व्यवस्था, सामजिक सुरक्षा, व्यापार अशी अनेक आव्हाने बायडेन सरकारसमोर आहेत. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी बायडेन यांनी १.९ ट्रिलियन डॉलर महाकाय प‌ॅकेज जाहीर केले होते. अमेरिकन रेस्क्यू प्लॅन याअंतर्गत छोटे व्यवसायीक, सरकार, राज्य, स्थानिक सरकार दिलासा देण्यात येणार आहे. प्रत्येकाला थेट मदत करण्याचा निर्धार या प‌ॅकेज अंतर्गत करण्यात आला आहे.

Biden presidency
अमेरिकेन लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा उद्देश

अमेरिकन लोकांसाठी खाजगी विमा बाजाराशी स्पर्धा करण्यासाठी तो मेडिकेअर सारखा सार्वजनिक पर्याय तयार करण्यात येईल. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अनुदानित आरोग्य विमा सुविधा असेल. बायडेनचा अंदाज आहे की, 10 वर्षांत त्याच्या योजनेसाठी सुमारे 750 अब्ज डॉलर्स खर्च होतील. याशिवाय गंभीर आजारांच्या उपचारासाठी खास औषधांच्या सुरुवातीच्या किंमतींवरही मर्यादा आण्यात येईल. बायडेन महागड्या औषधांच्या किंमतीवर बंदी घालणार आहेत. हे धोरण ट्रम्प यांनाही राबवायचे होते. मात्र, काँग्रेसकडून ते पारित करून घेऊ शकले नाही.

Biden presidency
बायडेन आणि ह‌ॅरिस यांची जोडी...

कोरोना महामारी संपत नाही. तोपर्यंत अर्थवव्यवस्था स्थिर होऊ शकत नाही, असे मत बायडेन यांनी व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्थेच्या दिर्घकालीन रिकव्हरीसाठी आणि अमेरिकेतील नॉन व्हॉईट आणि व्हॉईट यांच्यातील असमानता दूर करण्यासाठी वेगाने काम करण्याची गरज आहे. तसेच अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या कायदेशीर वास्तव करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहेत. जे बेकायदेशीर रित्या देशात राहतात. मात्र, अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे. अशा 11 मिलियन लोकांना नागरिक्त्व देण्यासाठी बायडेन उपाय शोधणार आहेत. तसेच देशातील कॉर्पोरेट आयकर दर 28 टक्के करण्याचा त्यांचा विचार आहे.

Biden presidency
लसीकरणाची व्यापक मोहिम

दहशतादाचा सामना करण्यासाठी हवाई हल्ले करण्याच्या कृतीचे बायडेन समर्थन करतात. बायडेन नाटोचे समर्थक आहेत. मास्को नाटोला कमजोर करण्यात, युरोपीय संघाला विभाजीत करण्यात आणि अमेरिकेतील निवडणूक प्रकिया कमकुवत करून पश्चिमी लोकशाहीचा पाया कमजोर करत आहे. आशिया-प्रशात सागरात नौसेना वाढवणे तसेच जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियासोबत असलेले संबंध मजबूत करण्याकडे त्यांचा कल आहे. याचबरोबर अफगाणिस्तान आणि मध्य पूर्वमधील युद्ध समाप्त करण्यात ट्रम्प यांच्या भूमिकेचे त्यांनी कौतूक केले. तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य तिथे ठेवण्यात यावेत, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Biden presidency
प्रत्येकाला थेट मदत करण्याचा निर्धार...

बायडेन सर्व लोकशाही देशांना भ्रष्टाचाराविरूद्ध लढा देण्यासाठी आणि हुकूमशाहीवाद रोखून मानवी हक्कांना पाठिंबा देण्यासाठी एका शिखर परिषदेसाठी आमंत्रित करू इच्छित आहेत. ट्रम्पप्रमाणेच बायडेन यांनीगी चीनवर आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तथापि, ट्रम्प यांच्या धोरणांनी काही काम झाल्याचे त्यांना वाटत नाही. चीनशी सौदा करण्यासाठी त्यांना अमेरिकन मित्रपक्षांत सामील व्हायचे आहे.

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. बंदूक बाळगण्याचे परवाने शिथिल आहेत. ओबामांच्या काळात बंदूक परवाने कठोर करण्याची चर्चा झाली होती. मात्र, अंमलबजावणी झाली नव्हती. आता पुन्हा बायडेन त्यावर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर वर्षाकाठी 400,000 डॉलर्सपेक्षा जास्त मिळकत असणाऱ्यांवर पेरोल ट‌ॅक्स लावण्यात येईल. हा कर कर्मचारी आणि नियोक्ते यांच्यात समान प्रमाणात 12.4 टक्के वितरित केला जाईल. सध्या कर नियम 137,700 डॉलरपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर लागू आहे. याचबरोबर गर्भपात अधिकारांचे बायडेन समर्थन करतात. तसेच ते ट्रम्प यांचा कुटुंब नियोजन नियम रद्द करतील.

शिक्षण हा मुद्यांवर बायडेन यांचे प्रेम आहे. त्यांच्या पत्नी जील यांनी हायस्कूल आणि कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवतात. कमी उत्पन्न असलेल्या सार्वजनिक शाळांसाठी फेडरल शीर्षक प्रोग्राम प्रस्तावित केला आहे. या शाळांनी शालेय शिक्षकांना स्पर्धात्मक वेतन आणि लाभ प्रदान करणे आवश्यक आहे. बायडेन यांची शाळांसाठीच्या फेडरल फंडिंगवर बंदी घालण्याची आणि सार्वजनिक सनद्यांना मदत करण्याची इच्छा आहे. सार्वजनिक निधी खाजगी शालेय शिक्षणासाठी वापरला जातो, अशा धोरणाचा ते विरोध करतात. लैंगिक गैरवर्तन नियमांसह ट्रम्प प्रशासनाने रद्द केलेली ओबामाकालीन धोरणे पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. बायडेन हे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी कम्युनिटी कॉलेजेसमध्ये वर्षाकाठी 25,000 डॉलर्स आणि सार्वजनिक महाविद्यालये विनामूल्य करण्याच्या कायद्यास समर्थन देतात.

ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी बायडेन यांनी 2 ट्रिलियन डॉलर्स प्रस्तावित केले आहेत. बायडेन प्रशासन फेडरल जमीनीवरील तेल आणि गॅस निर्मितीच्या नवीन परवानग्यांवर बंदी घालणार आहे. बिडेन पर्यावरण न्यायावर भर देतात. हवामान बदलासंदर्भातील पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला होता. त्या उलट भूमिका बायडेन घेताना दिसतील. याचबरोबर कोरोना संकटात नोकरी गेलेल्या हजारो बेरोजगारांना बायडन प्रशासनाकडून दरमहा 1,600 डॉलर्सचा भत्ता (1 लाख 17 हजार रुपये) दिला जाणार आहे. तर कुटुंबाला थेट 2 हजार डॉलर्सचा भत्ता देण्यात येणार आहे.

Last Updated : Jan 20, 2021, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.