वाश्गिंटन डी.सी. - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरामध्ये 7 कोटी 90 लाख 86 हजार 170 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 17 लाख 38 हजार 168 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर 5 कोटी 56 लाख 74 हजार 767 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरात कोरोनाचा प्रसार पाहता, सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 89 लाख 17 हजार 152 रुग्ण आढळले आहेत. तर 3 लाख 34 हजार 218 जणांचा मृत्यू झाला आहे. अमिरेकनंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारताता 1 कोटी 1 लाख 23 हजार 778 कोरोना रुग्ण तर 1 लाख 46 हजार 778 जणांचा बळी गेला आहे. भारतानंतर फ्रान्स, ब्राझिल, रशिया आणि ब्रिटनचा क्रमांक येतो.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळला असून तो वेगाने पसरत आहे. नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी बाळगण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये काल कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली 39 हजार 236 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांची आकडेवारी तब्बल 21 लाख 55 हजार 996 वर पोहचली आहे. ब्रिटनमध्ये लोकांना घरूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ब्रिटनच्या अनेक भागात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
हेही वाचा - जगभरातील दोन तृतीयांश विद्यार्थ्यांच्या घरी 'इंटरनेट' नाही - युनिसेफ