हैदराबाद - जगभरात सुरू असलेल्या कोरोनामुळे तब्बल 5 कोटी 89 लाख 97 हजार 869 लोकांना संक्रमित केले आहे. जगभरात सुमारे 13 लाख 93 हजार 837 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. आतापर्यंत 4 कोटी 7 लाख 72 हजार 679 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
जगात सर्वाधिक 1 कोटी 25 लाख 89 हजार 88 कोरोनाग्रस्त रुग्ण अमेरिकेत आहेत. तर आतापर्यंत तब्बल 2 लाख 62 हजार 701 कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टन येथील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत आजही कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्याप्रमाणात वाढत आहे.
अमेरिके खालोखाल भारताचा सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेला देश म्हणून दुसरा क्रमांक लागतो. आतापर्यंत 91 लाख 40 हजार 312 लोक कोरोनाग्रस्त झाले असून 1 लाख 33 हजार 773 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - अमेरिकच्या अध्यक्षपदाचा वाद सुटेना; ट्विटरने 'हा' घेतला निर्णय
हेही वाचा - अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, 8 जखमी