वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूच्या प्रसरारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 76 हजार 35 कोरोना रुग्ण आढळले असून 6 हजार 305 जणांचा मृत्यू झाला आहे.
अद्यायावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 56 लाख 40 हजार 155 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 35 हजार 602 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 95 लाख 28 हजार 714 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये कोरोना विषाणू अटोक्यात आला आहे. मात्र, त्याचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 लाख 69 हजार 153 एवढी असून 1 लाख 47 हजार 297 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेनंतर ब्राझिल दुसऱ्या क्रमाकांवर असून 22 लाख 89 हजार 951 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 84 हजार 207 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण 12 लाख 87 हजार 945 झाली आहे. तसेच भारतापाठोपाठ रशिया, दक्षिण अफ्रिका आणि पेरूमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.