वॉशिंग्टन डी. सी - चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 18 हजार 800 कोरोना रुग्ण आढळले असून 4 हजार 388 जणांचा मृत्यू झाला आहे.
अद्यायावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 46 लाख 33 हजार 37 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 8 हजार 539 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 87 लाख 30 हजार 163 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 लाख 96 हजार 855 ऐवढी असून 1 लाख 43 हजार 269 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे.
अमेरिकेनंतर ब्राझिल दुसऱया क्रमाकांवर असून 20 लाख 99 हजार 896 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 79 हजार 533 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण 11 लाख 18 हजार 43 झाली आहे.