वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 3 लाख 8 हजार 645 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. यामध्ये सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.
तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 46 लाख 28 हजार 393 कोरोनाबाधित आढळले असून 3 लाख 8 हजार 645 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 17 लाख 58 हजार 39 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.