ETV Bharat / international

Global Covid 19 Tracker: जगभरात ४३ लाख नागरिक बाधित, २ लाख ९२ हजार दगावले - जगभरात कोरोना रुग्ण

तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 43 लाख 42 हजार 354 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 92 हजार 893 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 16 लाख 2 हजार 443 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

Global COVID-19 tracker
Global COVID-19 tracker
author img

By

Published : May 13, 2020, 1:03 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 2 लाख 92 हजार 893 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.

Global COVID-19 tracker
जगभरात 2 लाख 92 हजार दगावले

तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 43 लाख 42 हजार 354 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 92 हजार 893 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 16 लाख 2 हजार 443 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

अमेरिकेतील रुग्णांची संख्या 14 लाख 8 हजार 634 कोरोनाबाधित असून 83 हजार 425 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेन, इटली आणि इंग्लमध्येही २ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 हजारपेक्षाअधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. तर चीनमध्ये पुन्हा कोरोनाबाधित आढळत असून चीन सरकारने वूहानधील सर्व नागरिकांची करोना चाचणी करण्याची योजना आखल्याची माहिती आहे.

अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.