हैदराबाद - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार ४२ लाख ५५ हजार ९४२ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून २ लाख ८७ हजार ३३२ रुग्ण दगावले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत आहे. एकट्या अमेरिकेत ८१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे १५ लाख २७ हजार नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तर वयोवृद्ध आणि आधीच आजारी असलेल्या नागरिकांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येत आहे. चीनमधून कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली होती. मात्र, आता जगातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणू पसरला आहे.
अमेरिकेत १३ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इटली, फ्रान्स, इंग्लड, रशिया, इराण, जर्मनी या देशांतही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आाहे. महामारी आटोक्यात आणण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आर्थिक उलाढाली ठप्प असून लाखो नागरिकांचे रोजगार गेले आहेत. अनेक देश आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.
विविध देशांतील कोरोनाची परिस्थिती