ETV Bharat / international

Global Covid 19 Tracker: जगभरात 2 लाख 80 हजार कोरोनाबाधित रुग्ण दगावले - जगभरात कोरोना रुग्ण दगावले

तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 41 लाख 1 हजार 641 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 80 हजार 435 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 14 लाख 41 हजार 734 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

Global COVID-19 tracker
Global COVID-19 tracker
author img

By

Published : May 10, 2020, 11:49 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 2 लाख 80 हजार 435 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.

तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 41 लाख 1 हजार 641 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 80 हजार 435 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 14 लाख 41 हजार 734 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

Global COVID-19 tracker
कोरोना जागतिक आकडेवारी

अमेरिकेतील रुग्णांची संख्या 13 लाख 47 हजार 309 कोरोनाबाधित असून 80 हजार 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेन, इटली आणि इंग्लमध्येही २ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 हजारपेक्षाअधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.

अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.