हैदराबाद - जगभरामध्ये ३७ लाख २७ हजार ८०२ पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २ लाख ५८ हजार ३३८ पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे विविध देशांत १२ लाख ४२ हजार ३४७ रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.
अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.
सर्वात जास्त कोरोनाच प्रसार झालेल्या देशांमधील परिस्थिती