गेल्या २४ तासांमध्ये जगभरात कोरोनाच्या तब्बल एक लाख रुग्णांची नोंद झाली, तर सुमारे साडेपाच हजार रुग्णांचा यात बळी गेला आहे. जगभरात सध्या कोरोनाचे १२ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत, तर सुमारे ६५ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (३,११,३५७) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ स्पेन (१,२६,१६८), इटली (१,२४,६३२), जर्मनी (९६,०९२), आणि फ्रान्सचा (८९,९५३) क्रमांक लागतो. तर, जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये (१५,३६२) झाले आहेत. त्यापाठोपाठ स्पेन (११,९४७), अमेरिका (८,४५२), फ्रान्स (७,५६०) आणि इंग्लंडचा (4,313) क्रमांक लागतो.
भारतात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अॅक्टिव रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जवळपास २६७ लोकांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.