जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होतो आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये जगभरातील कोरोनाचे सुमारे ७७ हजार नवे रुग्ण आढळून आले. तर सुमारे पाच हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरातील रुग्णांची संख्या ९,३५,९५७ वर पोहोचली आहे. तर, बळींची संख्या ४७,२४५ वर पोहोचली आहे.
अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाखांहून अधिक झाली आहे. जगातील सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. तर इटलीमधील कोरोनाच्या रुग्णांनी १ लाख दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक (१३,१५५) बळी झाले आहेत.
इटली आणि अमेरिकेपाठोपाठ स्पेन (९,३८७), फ्रान्स (४,०३२) आणि चीनमध्ये (३,३१२) सर्वाधिक बळी गेले आहेत.
हेही वाचा : हृदयद्रावक! अमेरिकेत कोरोनामुळे सहा आठवड्यांच्या बाळाचा मृत्यू...